potholes and water accumulated in road in first rain dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Rain : पहिल्याच पावसात पिंपळनेरमधील रस्त्यांची चाळण

सकाळ वृत्तसेवा

Dhule Rain : येथील शहरातील सटाणा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी या रस्त्याची चाळण झाली असून, आपण रस्त्यावरून प्रवास करतोय की खड्ड्यातून हाच प्रश्न पिंपळनेरकरांना पडला आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

संबंधित प्रशासनाने गेल्या आठवड्यातच खड्डे भरले होते. मात्र आठवडाही उलटत नाही तोच पहिल्या पावसातच पुन्हा खड्डे उघडे झाले आहेत. खड्ड्यांत पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. (potholes and water accumulated in road in first rain dhule news)

पिंपळनेर शहरात पाऊस आणि खड्डे हे समीकरण खूप जुनेच आहे. खड्ड्यांमुळे पिंपळनेरकरांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने खड्डे दिसत नाहीत आणि वाहनचालक अंदाज येत नसल्याने थेट खड्ड्यामध्ये गाडी घालतात. बऱ्याच वेळा तर खड्ड्यामध्ये गेलेली गाडी काढण्यासाठी वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागते.

पाऊस पडण्याअगोदर शहरातील सटाणा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जीची संबंधित प्रशासनाकडून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले, मात्र पहिल्याच पावसामध्ये संबंधित प्रशासनाचे पितळ उघडे पडण्यास सुरवात झाली. दर वर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत.

शहरातील रस्त्यांची झाली चाळण

शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून, आपण रस्त्यावरून प्रवास करतोय की खड्ड्यातून हाच प्रश्न पिंपळनेरकरांना पडला आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी झालेला खर्च वाया गेला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

फक्त नागरिकांची मनधरणी करण्यापुरताच खड्डे भरले की काय, असा प्रश्न आता नागरिक विचारताना दिसत आहेत. खड्ड्यांत पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. इतकेच नाही तर खड्ड्यांमुळे शहरात अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

दोंडाईचा परिसरात पावसाची हजेरी

परिसरात आषाढी एकादशीच्या दिवशी भल्या पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी बारापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. कोरडवाहू शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे. दरम्यान, पहाटे पाचपासून तर दुपारी दोनपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.

बागायती कपाशीला पावसाचा मोठा फायदा झाला आहे. आता कोरडवाहू शेतीत कापूस, मूग, उडीद, ज्वारी बाजरीची पेरणी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. दोंडाईचा, मालपूर, सुरात, चुडाणे, कलवाडे, अक्कलकोस, कर्ले, परसुळे आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. अनेक दिवसांपासून असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. आता पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, 'या' ६५ नेत्यांच्या नावांचा समावेश

Maharashtra Vidhan Sabha: दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अन् दोन राष्ट्रीय पक्ष; महाराष्ट्रात जागा वाटपात कोणाचा फायदा? कोणाचं नुकसान?

Bhushan Pradhan & Anusha Dandekar : "दादा-वहिनी" भूषण-अनुषाच्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्स ; डेटिंगची रंगली चर्चा

Ulhasnagar News : कॉलेज, डॉक्टरांवर निवडणूक जनजागृतीची जबाबदारी; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महानगरपालिकेने कसली कंबर

Vikramgad Assembly Assembly Election 2024 : मोखाड्यात भाजप मध्ये इनकमिंग सुरू

SCROLL FOR NEXT