Speaking at the Prime Minister's Vishwakarma Skill Development Scheme workshop at Nijyojan Bhawan Auditorium, Prafulla Umare was on the dais along with Upper Collector Dhananjay Gogte. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : PM विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा : प्रफुल्ल उमरे

शहरी तथा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजना राबविण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : शहरी तथा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजना राबविण्यात येत आहे. पारंपारिक शिल्प कारागीर आणि व्यावसायिकांमधील बारा बलुतेदार पद्धत आता १८ झाली आहे.

खादी ग्रामोद्योग आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येईल. असे प्रतिपादन एमएसएमई मंत्रालय मुंबईचे सहाय्यक निर्देशक प्रफुल्ल उमरे यांनी येथे केले. (Prafulla Umare statement of Take advantage of PM Vishwakarma Yojana nandurbar news)

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत सूक्ष्म लघु व मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात एक दिवशीय कार्यशाळा झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे होते. कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक सचिन गांगुर्डे, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे.

शहरी विकास प्राधिकरण सह आयुक्त नितीन कापडणीस, नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागूल, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी उपस्थित होते.श्री. गोगटे म्हणाले की बारा बलुतेदार पद्धतीत बदल होऊन आता मूर्तिकार व परंपरागत कला व्यवसाय यांचा समावेश झाला आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी लाभ घेऊन बेरोजगार तरुणांनी स्वावलंबी होण्याचे आवाहन गोगटे यांनी केले.

सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी कौशल्य विकास संदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. जिल्हा ग्रामीण बँकेचे महाव्यवस्थापक सचिन गांगुर्डे यांनी उपस्थित लाभार्थ्यांच्या कर्ज योजना संदर्भातील अडचणी संदर्भात समर्पक माहिती दिली.

सूत्रसंचालन आर. बि.गवांदे यांनी तर आभार योगेश बधान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी, ज्येष्ठ सहाय्यक आर.बि. गवांदे, उद्योग पर्यवेक्षक योगेश बधान, वसंत गावित, कनिष्ठ सहाय्यक नीलेश बोरसे, श्रीमती. एस. के. पाटील आदींनी परिश्रम घेतले.

या व्यवसायांचा समावेश

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसायांमध्ये असलेले कारागीर सुतार, गवंडी, सोनार (दागिने कारागीर) शिल्पकार (दगड फोडणारे) लोहार, चर्मकार, कुंभार, बोट बांधणारे, न्हावी.

हत्यारे व अवजारे बनवणारे, धोबी, विणकर कामगार, माळी (फुल कारागीर) खेळणी बनवणारे, शिंपी, कुलूप बनवणारे, मासे पकडण्याची जाळी बनवणारे, चिलखत शस्त्रे बनवणारे आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT