Dhule municipal corporation news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पुरवणी अंदाजपत्रकाचे महापालिकेमध्ये कामकाज; खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ बसविताना कसरत

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महापालिका प्रशासनाकडून २०२२-२०२३ या वर्षाचे पुरवणी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी आयुक्त देवीदास टेकाळे यांच्या उपस्थितीत बैठकांचे सत्र सुरू आहे. अंदाजपत्रकात गृहीत उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसविताना लेखा विभागाची कसरत होत आहे. (preparing supplementary budget by municipal administration final stage Reconciliation of income expenditure assumed in budget difficult dhule news gbp00)

महापालिका प्रशासनाने २०२२-२०२३ या वर्षासाठी ५८६ कोटी ९९ लाख ४६ हजारांचे अंदाजपत्रक फेब्रुवारी २०२२ मध्ये स्थायी समितीला सादर केले होते. स्थायी समितीने अंदाजपत्रकात काही तरतुदी सुचविल्याने अंदाजपत्रक ६५० कोटी ५४ लाख ४६ हजार रुपयांवर गेले.

त्यानंतर हे अंदाजपत्रक स्थायी समितीने अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे सादर केले. महासभेने पुन्हा काही तरतुदी सुचविल्याने अंदाजपत्रक ७३२ कोटी ७० लाख ४६ हजारांवर गेले. त्यानंतर आता पुरवणी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम महापालिकेत सुरू आहे. एप्रिल ते नोव्हेंबरअखेर झालेला खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसविण्यात येत आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

त्यासाठी आयुक्त टेकाळे यांच्या दालनात बैठक झाली. भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर नागसेन बोरसे, स्थायी समितीचे सभापती शीतल नवले उपस्थित होते. अंदाजपत्रकात तरतुदीत वाढ करताना उत्पन्नवाढीचे विविध मार्गही सभागृहाने सुचविले होते. त्यावर काय अंमलबजावणी झाली, ज्याचा लेखाजोखा पदाधिकाऱ्यांकडून मागितला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT