dhule municipal corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मनपा सदस्य चौधरींकडून प्रश्‍नांची मांडणी; पाणीप्रश्‍नी मनुष्यबळाला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : हे जग सोडून जाणाऱ्या व्यक्तीला नातेवाईक शेवटची इच्छा विचारतात आणि ती पूर्णही करतात असे उदाहरण देत पंचवार्षिक कालावधीतील शेवटचे १५-२० दिवस बाकी आहेत, त्यामुळे आमच्या काही इच्छा पूर्ण करा, अशी भावनिक साद महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नरेश चौधरी यांनी सभापती, अधिकाऱ्यांकडे घातली.

श्री. चौधरी यांच्या या आर्जवाने छोट्या-छोट्या समस्यांसाठी गेली साडेचार वर्षे झगडत असतानाही प्रश्‍न सुटले नाहीत हेच अधोरेखित झाले.(Presentation of questions by Municipal Member Chowdhury of Water issue dhule news )

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्य चौधरी यांनी प्रभागातील विविध प्रश्‍न पुन्हा एकदा मांडले. प्रभागात साफसफाईसाठी केवळ तीन-चार कर्मचारी आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचारी वाढविण्याची मागणी करत आहे, मात्र कार्यवाही होत नाही. आता शेवटी-शेवटी तरी हे काम करा, असे त्यांचे म्हणणे होते.

त्यासाठी त्यांनी जग सोडून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या अपूर्ण इच्छा विचारून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो असे उदाहरण देण्याची वेळ आली. श्री. चौधरी यांनी हसत-हसत हा मुद्दा मांडला पण त्यामुळे महापालिकेतील यंत्रणेची कार्यपद्धती किती बोथट झाली आहे, हेच एका अर्थाने अधोरेखित झाले.

हसत-हसत प्रश्‍नावर बोट

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्‍नावरही सदस्य श्री. चौधरी यांनी पदाधिकारी, अधिकाऱ्यांना आरसा दाखविला. महापालिकेच्या आवारात आपल्या वाहनाखाली कुत्र्याची काही पिल्ले होती, वाहन काढण्यासाठी त्या पिल्लांना हटविण्याचा प्रयत्न करताना दमछाक झाली. पिल्लांना दूर करताना त्यांची आई अंगावर येत होती. हा खेळ अर्धा तास चालला, असे म्हणत त्यांनी मोकाट कुत्र्यांच्या प्रश्‍न मांडला.

या वेळीही हशा पिकला मात्र प्रश्‍नाचे गांभीर्य त्यांनी अधोरेखित केले. एका ठिकाणी रस्त्यावर दहा-पंधरा कुत्र्यांच्या झुंडीने दहशत निर्माण झाली, शेवटी या भांडणाऱ्या कुत्र्यांच्या झुंडीला एका गायीने पांगवले, असे म्हणत श्री. चौधरी यांनी एका जनावरालादेखील समस्या कळली. आपल्याला मात्र कळत नाही, अशी कोपरखळी मारली.

महिन्यापासून लाइट सुरू

सदस्या नाजियाबानो पठाण यांनी प्रभागातील काही भागात गेले महिनाभरापासून दिवसरात्र पथदीप सुरू असून, तक्रार करूनही ते बंद होत नसल्याचा मुद्दा मांडला. त्यावर सहाय्यक अभियंता एन. के. बागूल यांनी यात मनपाचा काहीही दोष नसून तांत्रिक कारणामुळे समस्या असून, ही समस्या महावितरण कंपनीच दुरुस्त करू शकेल.

याबाबत महावितरणकडे तक्रारही केली असल्याचे सांगितले. सदस्य सुनील बैसाणे यांनी अतिक्रमण निर्मूलनानंतर माती-विटांचे ढीग तसेच पडून असल्याचा मुद्दा मांडला.

पाण्यासाठी मनुष्यबळ

अक्कलपाडा योजनेसाठी बाह्ययंत्रणेमार्फत ३३ कर्मचारी घेणे, पाणीपुरवठा विभागासाठी बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ घेणे, मानधन तत्त्वावरील स्वच्छता निरीक्षकांना सहा महिने मुदतवाढ यासह कार्योत्तर खर्चाचे विषय मंजूर करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cash Seized: निवडणुकीच्या धामधुमीत पावणेदोन कोटींवर मुद्देमाल जप्त; 80 लाखांचे अमली पदार्थ तर 27 लाखांच्या दारूचा समावेश

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

IND vs NZ, Mumbai Test: भारतीय संघातून जसप्रीत बुमराह, तर न्यूझीलंड संघातून सँटेनर बाहेर; पाहा दोन्ही टीमच्या प्लेइंग-११

Google Fined: रशियाने गुगलला ठोठावला डॉलर 20,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000चा दंड

Aslam Sheikh Education: "आधी बारावी अन् मग नववी..." काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या शिक्षणावरुन गोंधळ; भाजपच्या आरोपामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT