inflation sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Inflation News : महागाईचा श्रावण मास! धान्य, जिन्नसांच्या दराचा वाढता आलेख

सकाळ वृत्तसेवा

Dhule Inflation News : पावसाने ओढ घेतल्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसू लागला आहे. भाज्या, धान्य, जिन्नसांच्या दराचा वाढता आलेख सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर जाईल की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.

भाजीपाल्याच्या लागवडीवरही परिणाम होत असल्याने भाव कडाडत चालले आहेत. परिणामी, अधिक मास आणि आता श्रावण मास महामागाईचा ठरताना दिसत आहे.

लांबलेल्या पावसामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर ग्राहकांना डोईजड होण्यासारखे आहेत. (Prices of Vegetables Grains Grains increasing dhule news)

जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात भाजीपाल्याच्या लागवडीवर परिणाम झाला, तर जुलैत हाती येणारे पीक धोक्यात आले. त्यामुळे भाज्यांची आवक बाजारात घटते आहे.

त्याचा परिणाम दरवाढीत झाला आहे. कारले, दोडके, गिलके, भेंडी, ढोबळी मिरची आदींची आवक कमी होऊन दर सरासरी २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. शिवाय बाजारपेठेत भाज्या, धान्य, जिन्नसांचा काहीअंशी तुटवडा जाणवत असल्याने दर कमालीचे वाढत चालले आहेत.

महागाईने जेवण बेचव

डाळींसह विविध जिन्नसच्या महागाईने सर्वसामान्यांचे जेवण बेचव होताना दिसते आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत तूरडाळ, मूगडाळ, शेंगदाणा, साबूदाण्याच्या दराने उसळी घेतली आहे. जिरे, लसूण, हळद, आले या फोडणी-मसाल्यासाठीच्या जिन्नसांचे दरही चांगलेच वधारले आहेत.

धान्य तसेच अन्य जिन्नसांच्या दरांची गेल्या महिन्यातील दराशी तुलना केल्यास ही वाढ सहज दिसून येते. गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील घाऊक दरांशी तुलना करता दरांमध्ये सरासरी १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते.

अशी होतेय दरवाढ

वर्षभरात लसणाचे दर किलोमागे २७० टक्क्यांनी महागल्याचे दिसते. त्याचप्रमाणे जिऱ्याचे दरही वर्षापूर्वीच्या सरासरी २५० ते ३५० रुपये किलोवरून सध्या ६५० ते ७०० रुपये किलोवर पोचल्याचे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील दरतालिकेवरून दिसते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशीच वाढ साखर, शेंगदाणे, साबूदाणा, शेंगदाणा तेल यांच्या दरातही दिसून येते. गेल्या पंधरवड्यापूर्वी अनेक जिन्नसांचे दर वधारल्याचे दिसते. या दरवाढीस पाऊस नसल्याचे कारण व्यापाऱ्यांकडून सांगितले जाते.

डाळींचे दर वाढले

स्थानिक बाजारपेठेत डाळींचे भाव वाढले आहेत. घाऊक बाजारात सरासरी १३५ ते १५५ रुपये किलो असणारी तूरडाळ आता सरासरी १४५ ते १५० रुपयांवर पोचली आहे. मूगडाळ, मसूरडाळ यांच्या दरातही किलोमागे दोन रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षभरात तूरडाळीच्या दरात किलोमागे ३१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. धुळे बाजार समितीत लाल तूर आठ हजार ४२५ रुपये क्विंटलने खरेदी केली जात आहे.

गेल्या महिन्यात ९० रुपये किलोच्या आसपास असलेल्या लसणाचे घाऊक बाजारातील दर सरासरी ११० ते १२० रुपयांवर पोचले आहेत. हळदीचे घाऊक दर प्रतिकिलो सरासरी २०० रुपयांवर पोचले आहेत. गेल्या वर्षीच्या दरांच्या तुलनेत सध्या हळदीचे दर दुप्पट झाल्याचे दिसते. गेल्या महिन्याभरापासून वाढलेल्या टोमॅटोच्या दरांमध्ये घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT