Congress workers showing the letter confirming the approval of the Urban Health Center. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिंदखेड्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे पालटणार रूप! नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : बारा वर्षांपूर्वी बारा लाख रुपये खर्चून बांधलेल्या आणि तेव्हापासूनच पडीक झालेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र क्रमांक २ चे दिवस आता काँग्रेसच्या पाठपुराव्यानंतर पालटणार आहेत.

या ठिकाणी आता नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर झाले आहे.( primary health center will change in Shindkheda dhule news )

त्याबाबतचे संबंधित विभागाचे पत्र गुरुवारी (ता. १२) शहर काँग्रेसला मिळाले. पत्र प्राप्त होताच पक्षाचे शहराध्यक्ष दिनेश माळी, नगरसेवक सुनील चौधरी, दिदीपक देसले, कैलास वाघ, प्रा. दीपक माळी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांसह नागरिकांनी संबंधित पडक्या केंद्रासमोर जाऊन आनंद व्यक्त केला.

येथील माळीवाड्यात नदीकिनारी २०११ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली. परिसरात शेतकरी, शेतमजुरांची मोठी संख्या असल्याने हे केंद्र त्यांच्यासाठी वरदान ठरणारे होते. मात्र केंद्र प्रत्यक्षात सुरूच झालेच नाही. त्याचे दरवाजे, खिडक्या अवघ्या वर्षभरात चोरीला गेल्या. इमारत डुकरांचे ‘मॅटर्निटी होम’ बनले. इमारत काटेरी झुडपांनी वेढली गेली. केंद्र सुरू करावे यासाठी वारंवार विविध घटकांकडून मागण्या झाल्या. मात्र उपयोग झाला नाही.

आता मात्र शहर काँग्रेसने यात लक्ष घातले. १४ ऑगस्टला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, माजी सभापती प्रा. सुरेश देसले, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिनेश माळी, माजी उपनगराध्यक्ष दीपक देसले या काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण केले.

त्यानंतरही वारंवार याबाबत पाठपुरावा केला. त्यास आता यश मिळाले. आता या जागी एक एमबीबीएस डॉक्टर, एक परिचारिका, एक आरोग्यसेवक आणि एक शिपाई एवढे कर्मचारी असतील. इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. तोही लवकरच मंजूर होणार असल्याचे वृत्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT