MSEDCL sakal
उत्तर महाराष्ट्र

MSEDCL : शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याबाबत सहकार्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीने कंबर कसली आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते बदलण्याची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे,

असे पत्रकाद्वारे सांगत शेतकऱ्यांनीही कृषिपंपांचे वीजबिल (Electricity Bill) भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. (process of change at rapid pace msedcl Appeal to farmers for cooperation in paying electricity bills dhule news)

शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महा‍वितरणने सूक्ष्म नियोजन केले आहे.‍ कृषिपंपांचे रोहित्र नादुरुस्त होऊ नये यासाठी ‍ विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते लवकरात लवकर बदलून देत शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.

याबरोबरच शेतकऱ्यांनीही रोहित्र जळू नये वा नादुरुस्त होऊ नये, यासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे. जितक्या अश्वशक्तीसाठी वीजजोडणी मंजूर झालेली आहे, तितक्याच अश्वशक्तीचा कृषिपंप शेतकऱ्यांनी वापरावा.

तसेच आकडे टाकून अथवा अनधिकृतरीत्या वीज वापरू नये आणि इतरांनाही तसे करू देऊ नये, जेणेकरून आपले रोहित्र सुस्थितीत राहील व अतिभारामुळे ते जळणार नाही.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

महावितरण कंपनी वीजनिर्मिती करत नाही, तर विविध स्रोतांकडून दरमहा वीज विकत घेऊन ती वीज आपल्या ग्राहकांना वितरित करीत असते. शेतीसाठी अत्यंत सवलतीचा वीजदर आहे. त्यामुळे शेतकरी ग्राहकांनी थकीत वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मार्चपर्यंत ३० टक्के सवलत

महावितरणतर्फे २०२१ पासून महा कृषी ऊर्जा अभियान राबविले जात असून, जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत यावर ५० टक्के सूट देण्यात आलेली होती.

दरम्यान, ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात येत असून, विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT