Zilla Parishad News esakal
उत्तर महाराष्ट्र

Zilha Parishad News : साडेपाचशेवर जागांसाठी होणार भरती

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्हा परिषदेंतर्गत गट ‘क’मधील सर्व संवर्गांतील पदे भरण्यात येणार आहेत. मात्र, यामधील वाहनचालक आणि गट ‘ड’मधील पदे वगळून उर्वरित पदे सरळसेवेमार्फत भरण्यात येणार आहेत.

ही पदे १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरावयाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेंतर्गत गट ‘क’मधील राज्यातील सुमारे १९ हजार पदे भरली जाणार आहेत. या संदर्भात ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. (Process of direct service written test will be implemented before August 15 Recruitment will be held for 5500 seats Dhule News)

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे २१ ऑक्टोबर २०२२ व १५ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला. सर्व जिल्हा परिषदांतील विविध ३१ संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय पारित झाला आहे. त्यानुसार उमेदवारांच्या वय निश्चितीसाठी १ जून २०२३ हा दिवस निकषित असेल.

सीईओंवर जबाबदारी

रिक्त जागा व अर्ज सादर करण्याचा तपशील जिल्हा परिषद जाहीर करेल. अर्ज व शुल्क ऑनलाइन भरायचे आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा परिषद करेल. परीक्षा ऑनलाइन होईल. परीक्षेसह निवडीवर विभागीय आयुक्तांची देखरेख असेल. अर्जदाराने नमूद केलेलेच परीक्षा केंद्र मिळेल असे नाही.

परीक्षेपूर्वी सात दिवस ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्रे प्राप्त होतील. ही परीक्षा विविध ३१ पदांसाठी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा परिषदांनी बार कोड वापरून नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत. जिल्हा परिषदांच्या भरती प्रक्रियेचे कामकाज टाटा कन्सल्टन्सी व आयबीपीएस कंपनी करेल. परीक्षेबाबत जबाबदारी सीईओंवर असेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लेखी परीक्षेचे स्वरूप

जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांच्या कर्मचारी भरतीसाठी संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर झाले आहे. त्यानुसार स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका काढली जाईल. संवर्गनिहाय वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असतील.

परीक्षेसाठी दहावी, बारावी, पदवी व संबंधित पदांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांवर आधारित प्रश्न असतील. शासनाने गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे. रिक्त पदे १५ ऑगस्टपूर्वी भरण्याची शासनाची सूचना आहे.

वयोमर्यादा दोन वर्षे शिथिल

पदभरतीचे जाहीर प्रकटन, उमेदवारी अर्ज मागविणे, उमेदवारी अर्जांची छाननी, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे, उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करणे, परीक्षा आयोजन आणि निकाल व नियुक्त्या देणे, अशी ही प्रक्रिया चालेल.

गट ‘क’मधील सर्व संवर्गातील भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची सूट देण्यात आली आहे. तशी मार्गदर्शक सूचना राज्य प्रशासनाचे उपसचिव पो. द. देशमुख यांनी जारी केली आहे. ३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार खुल्या वर्गासाठी ३८, तर मागास प्रवर्गासाठी ४३ वयोमर्यादा आहे. मात्र, त्यात दोन वर्षे शिथिलता देण्यात येणार आहे.

२०१९ मध्ये ज्यांनी अर्ज सादर केले होते, वयाधिक्यामुळे त्यांचे अर्ज अपात्र ठरू नये म्हणून २०२३ च्या जाहीर प्रकटनात दोन वर्षे शिथिलता देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील ४०, तर मागासवर्गीयांसाठी ४५ वर्षे वयोमर्यादा विचारात घेतली जाणार आहे. भरतीला जुलैअखेर सुरवात केली जाईल. कनिष्ठ सहाय्यक पदाकरिता यापूर्वी मॅट्रिक उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता होती. त्यामध्ये बदल करून आता या संवर्गासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावी लागेल.

पेसाची पदे भरताना दक्षता घ्यावी

अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) सरळसेवेची पदे निश्चित करून ती भरण्याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद आहे.

अनुसूचित क्षेत्रातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांमधून भरताना स्थानिक अनुसूचित क्षेत्रात काम करणारे बिगरअनुसूचित जमातीचे कर्मचारी अथवा बिगरअनुसूचित क्षेत्रात काम करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या समायोजनेची प्रक्रिया ही नव्याने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी पार पाडावी, असेही सूचित आहे.

धुळे, नंदुरबारला ५५२ पदे रिक्त

धुळे जिल्ह्यात २१९, तर नंदुरबार जिल्ह्यांत ३३३, अशा ५५० वर रिक्त जागा आहेत. दोन्ही जिल्हा परिषदेत गट ‘क’मध्ये ३१ संवर्गातील जवळपास ५५२ पदे सरळसेवेने भरली जातील. यासोबतच एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतून, तर २० टक्के पदे अनुकंप भरती प्रक्रियेदरम्यान भरली जातील.

भरती प्रक्रियेत आरोग्यसेवक, प्रयोगशाळा तज्ज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्यसेविका, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहायक, लघु टंकलेखक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्ताराधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक तसेच ‘ड’ वर्गात शिपाई पदांचा समावेश आहे.

परीक्षेसाठी चार प्रकार निश्चित

परीक्षेसाठी इंग्रजी (इंग्रजी माध्यम) विषयासाठी १५ प्रश्न (३० गुण), मराठीसाठी (मराठी माध्यम) १५ प्रश्न (३० गुण), सामान्य ज्ञान (इंग्रजी व मराठी माध्यम) १५ प्रश्न (३० गुण), गणित, बुद्धिमापन (इंग्रजी व मराठी माध्यम) १५ प्रश्न (३० गुण), तांत्रिक विषय (इंग्रजी/इंग्रजी व मराठी माध्यम) ४० प्रश्न (८० गुण), असे १०० प्रश्न परीक्षेसाठी असतील.

त्यासाठी २०० गुण निश्चित करण्यात आले आहेत. भरतीसाठीच्या परीक्षेत चार प्रकार निश्चित आहेत. या प्रकारांना अनुक्रमे अ, ब १, ब २ आणि क अशी नावे देण्यात आली आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमापन आणि तांत्रिक विषयांशी संबंधित प्रश्न असतील. त्यात प्रत्येकी दोन गुणांचे १०० प्रश्न असतील. यासाठी दोन तासांचा कालावधी दिला जाणार असल्याचे ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT