Young women drawing rangoli on the procession route. Next Neelaben Mehta, Kiran Suryavanshi, Jagdish Pardeshi. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : ‘जयश्रीरामा’च्या घोषाने तळोद्यात भक्तिरस

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तळोद्यात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. त्याअंतर्गत रविवारी (ता. २१) शहरात मिरवणूक काढण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तळोद्यात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. त्याअंतर्गत रविवारी (ता. २१) शहरात मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, मिरवणूक मार्गावर भल्या पहाटेपासून चार तास अथक मेहनत घेत, विविध रंगांचा वापर करीत आकर्षक रांगोळ्या सुमारे १५ युवतींनी काढल्या.

मुख्य रस्त्यावरील रंगीबेरंगी रांगोळ्या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरल्या आणि रांगोळ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. (procession was taken out in Talodaya on occasion of Prana Pratishtha ceremony of Shri Ram Temple in Ayodhya nandurbar news)

अयोध्येत श्रीरामाचे मंदिर व्हावे यासाठी शेकडो वर्षे वाट पाहावी लागली. सोमवारी (ता. २२) मान्यवरांच्या उपस्थितीत अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार असून, यानिमित्त तळोदा शहरात विविध धार्मिक कार्यक्रम, उपक्रम घेण्यात येत आहेत. त्यानुसार रविवारी सकाळी मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीत विविध पथके सामील झाली होती. दरम्यान, ही मिरवणूक बिरसा मुंडा चौकापासून स्मारक चौक, तेथून पुढे आनंद चौकमार्गे श्रीराम मंदिरापर्यंत काढण्यात आली. दरम्यान, यानिमित्त मिरवणूक मार्गावर रांगोळी काढून मार्गाची सजावट करण्यात आली होती.

आकर्षक रांगोळ्यांनी वेधले लक्ष

शहरात मिरवणूक मार्गावर भगवे झेंडे, भव्य कटआउट लावून मिरवणूक मार्ग स्वच्छ करण्यात आला होता. या मार्गावर सुमारे पंधरा युवती पहाटेपासून चार तास अथक परिश्रम करीत, विविध रंगांचा वापर करून आकर्षक रांगोळ्या साकारल्या होत्या.

रस्त्याच्या दुतर्फा व मध्यभागी काढण्यात आलेल्या भव्य व रंगीबेरंगी रांगोळ्यांनी शहरातील मुख्य रस्ता खुलून दिसत होता.

रांगोळ्या काढण्यासाठी गौतमी पवार, अमृता सूर्यवंशी, कुंजल राणे, प्रणाली शेंडे, मयूरी कर्णकार, माधवी सूर्यवंशी, करुणा लोहार, युगश्री माळी, सानिया माळी, दिव्या माळी, लीना कर्णकार, निराली मगरे, प्रतीक्षा मिस्तरी.

सृष्टी गुजराथी, खुशी पाटील या युवतींनी तसेच हर्ष मगरे, तेजस मगरे, प्रेम सूर्यवंशी या युवकांनी मेहनत घेतली. त्यांना भाजपच्या महिला आघाडीच्या नीलाबेन मेहता, आमदारांचे स्वीय सहाय्यक किरण सूर्यवंशी, जगदीश परदेशी यांनी मदत केली.

आमदारांनी केले कौतुक

सकाळी नऊला मिरवणुकीला सुरवात होणार असल्याने मिरवणूक मार्गावर रांगोळी काढण्यासाठी संबंधित युवती थंडीत पहाटे सहालाच बिरसा मुंडा चौकात हजर होत्या.

त्यांनी तेथून रांगोळ्या काढण्यास सुरवात केली. आमदार राजेश पाडवीदेखील सकाळी सहाला बिरसा मुंडा चौकात जातीने हजर झाले आणि रांगोळ्या काढणाऱ्या युवतींचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT