Dhule News : उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याने मोटार वाहतुकीचा गुन्हा दाखल न करता टॅक्टर सोडून देण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह हवालदाराला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
बुधवारी (ता. १७) सायंकाळी ही कारवाई केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला. (PSI and constable caught red handed while accepting bribe of Rs 5000 in ACBs net dhule news)
बोरमळी (आंबे, ता. शिरपूर) गावातील शेतकरी ट्रॅक्टरमध्ये ऊस भरून सत्रासेन (ता. चोपडा) येथून शिरपूर-धुळेमार्गे रावळगाव साखर कारखाना येथे जात होते. त्यादरम्यान ट्रॅक्टर १५ जानेवारीला धुळ्यातील महामार्गावरील उड्डाणपुलावर उलटला.
त्यानंतर १६ जानेवारीला देवपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हरिश्चंद्र जानकीराम पाटील यांनी तक्रारदार शेतकऱ्यास पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध मोटार वाहतुकीचा गुन्हा दाखल न करता ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
त्यामुळे शेतकऱ्याने बुधवारी (ता. १७) धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली.
त्यादरम्यान पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे लाचेची मागणी करून हवालदार रवींद्र मोराणीस यांना भेटण्यास सांगितले.
तेव्हा हवालदार मोराणीस यांनी तक्रारदाराकडे पाच हजारांच्या लाचेची रक्कम देवपूर पोलिस ठाण्यात स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, पथकातील पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रशांत बागूल, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.