Kapdane (Dhule): When sowing wheat with a mini tractor in the field of Bhatu Vishram Patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : विहिरींना चांगल्या पाण्यामुळे रब्बीच्या पेरण्यांना वेग

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : धुळे तालुक्यात खरिपाच्या उत्तरार्धात सातत्यपूर्ण पाऊस झाला. या पावसाने अद्यापही नदी-नाले झुळझुळ वाहत आहेत. लहान-मोठ्या बंधाऱ्यांमध्ये अद्यापही बऱ्यापैकी पाणी आहे. धरण आणि प्रकल्प तुडुंब आहेत.

विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी चांगलीच उंचावली आहे. बागायती रब्बी हंगामाचे क्षेत्र कमालीचे वाढणार आहे. गहू आणि हरभरा पेरणीस वेग आला आहे. शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणीस प्राधान्य देत आहेत. (Rabi sowing speed up due to good water supply to wells Preference for sowing tractor Huge growth in horticulture sector Jalgaon News)

मुबलक पाणी

गेल्या तीन वर्षांपासून उत्तरार्धाचा पाऊस अधिक होत आहे. जमिनीची पाणीपातळी कमालीची वाढली आहे. विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळीही वर आली आहे. धुळे तालुक्यात बागायती क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

रब्बी पेऱ्यात वाढ

तालुक्यात कांदा व भाजीपाल्याचे उत्पादन अधिक काढले जात असते. पण बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी रब्बी बाजरी आणि गहू पेरणीकडे कल वाढविला आहे. बागायतदार शेतकरी यांत्रिक पेरणीत गुंतले आहेत. एकरी सातशे ते आठशे रुपये घेतले जातात. एकाच वेळी पेरणी आणि खतही लावले जात असल्याने, शेतकऱ्यांची बचत होत आहे. बाजरी आणि गव्हाचा बाजारभाव दोन हजारांपेक्षा अधिक आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

तालुक्यासह जिल्ह्यातील धरणांचे आवर्तन अद्याप दिले गेलेले नाही. कोरडवाहू शेतकऱ्यांना धरणाच्या पहिल्या आवर्तनाची प्रतीक्षा आहे. थंडीत चांगली वाढ झाली आहे. रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

"शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात बाजरी, गहू आणि हरभऱ्याचा पेरा वाढविला पाहिजे. चांगले उत्पादन येते. भावही बऱ्यापैकी असल्याने परडवणारा हंगाम ठरेल. अतिपावसाने खरिपाचा हंगाम नुकसानकारकच ठरला."

-भटू पाटील, प्रगतिशील शेतकरी, कापडणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT