Nandurbar News : महसूल आणि जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांनी लोकाभिमुख कामातून शासनाने निर्धारित केलेले उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. (Radhakrishna Game statement of Government agencies should achieve their goals through people oriented work Nandurbar News)
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, जिल्हा परिषदेसह विविध यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बुधवारी (ता. ३) बोलत होते. जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, विभागीय आयुक्त.
कार्यालयाच्या उपायुक्त तथा पालक अधिकारी राणी ताटे, उपायुक्त विठ्ठल सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की (तळोदा), विनायक महामुनी (नंदुरबार) यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपाययोजना करा
विभागीय आयुक्त गमे म्हणाले, की शासनाने विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यामातून शासकीय महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्चित केलेले असते. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक लोकाभिमुख राहून लोकांना योजना, उपक्रम यातून होणारे फायदे लक्षात आणून दिले तर शासनाने निर्धारित केलेले कुठलेही उद्दिष्ट साध्य करणे तसे अवघड नाही.
नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून, या जिल्ह्यात शासकीय सेवांच्या माध्यमातूनच येथील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच जिल्ह्याचे महसुली उत्पन्नवाढीसाठी मोठी मदत होऊ शकते. मार्चअखेरीस शासकीय जमीन महसूल वसुली व शिल्लक वसुलीचे नियोजन आजपासून करावे.
त्यासाठी मागील वर्षी याच दिवशी असलेल्या वसुलीच्या अंदाजाने गौण खनिज, अवैध गौण खनिजाच्या कारवाईत तसेचयापूर्वीच्या प्रलंबित दंडवसुली, प्रलंबित करमणूक शुल्क वसुलीबाबत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
पाणी, चाराटंचाईबाबत सूचना
महाराजस्व अभियान २०२३ ची फलनिष्पत्ती व महाराजस्व २०२४ च्या अंमलबजावणीबाबत आढावा घेताना विभागीय आयुक्त गमे यांनी ई-चावडी, ई-हक्क प्रणाली, ई-पीक पाहणी (रब्बी) व डिजिटल क्रॉप सर्व्हे, ई-ऑफिस, ई-रेकॉर्ड, ई-मोजणी, नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार नोंदीबाबत आढावा घेतला.
ई-पंचनामा व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत वेळोवेळी सतर्क राहून शासन व नागरिक यांच्यातील सेतूच्या रूपाने काम करण्याची अपेक्षा व्यक्त करताना टंचाई आराखड्याच्या नियोजनास प्राधान्य देताना पिण्याचे पाणी, चाराटंचाईचे आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्ह्यातील विविध योजना, उपक्रमातून झालेली उद्दिष्टपूर्ती, भविष्यातील नियोजन याबाबतचे सादरीकरण केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त तथा पालक अधिकारी राणी ताटे, विठ्ठल सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, विनायक महामुनी यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. बैठकीच्या सुरवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले.
विविध योजनांचा आढावा
पीएम किसान योजना, अकृषिक आकारणी व सनद, कमी-जास्त पत्रके-अकृषिक परवानगी व भूसंपादन, शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणी व मतदारयादी, पीजी पोर्टल व आपले सरकार प्रलंबित प्रकरणे, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (सीएमओ)कडील प्रलंबित प्रकरणे, गायरान जमिनीवरील अतिक्रमणे, सलोखा योजना, पोलिसपाटील, कोतवाल, अनुकंपा भरती, प्रधानमंत्री.
आवास योजना (पीएमएवाय)अंतर्गत प्रलंबित जागा मागणीचे प्रस्ताव, बीएसएनएल, सौरऊर्जा प्रकल्पासाठी (एमएसकेव्हीवाय) जमीन प्रदान, विकसित भारत संकल्प यात्रा, मनरेगासह जिल्हास्तरावर प्रलंबित असलेल्या खुल्या प्रवर्गातून शिफारस प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्रांच्या पडताळणीबाबत श्री. गमे यांनी आढावा घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.