Deputy Superintendent of Police Sachin Hire, Assistant Inspector Jayesh Khalane and colleagues with the machinery seized from the fake 'DEF' factory. 18 lakh bucket printing machine in the second photo. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : हेंद्र्यापाड्यात बनावट यूरिया कारखान्यावर छापा; 53 लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : औद्योगिक युरियापासून डिझेल एक्झॉस्ट फ्लूईड (डीईएफ) तयार करणारे संयंत्र, थेट प्लास्टिक बाटल्यांवर प्रिंटिंग करणारे अद्ययावत मशिन, औद्योगिक प्रयोजनासाठी वापरण्यात येणारा युरियाचा मोठा साठा असलेल्या कारखान्यावर गुरुवारी (ता. ३०) रात्री छापा टाकून सांगवी पोलिसांनी सुमारे ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

बनावट युरिया ‘डीईएफ’ तयार करण्याच्या संशयावरून तिघांविरोधात गुन्हे दाखल झाले.(Raid on fake urea factory in Hendryapada dhule crime news)

राज्यात प्रथमच बनावट यूरिया तयार करण्याचा कारखाना पळासनेर (ता. शिरपूर) जवळ हेंद्र्यापाडा येथे आढळला. तेथून थेट नाशिक, मध्य प्रदेशाची सीमा व नंदुरबारपर्यंत बनावट ‘डीईएफ’चा पुरवठा केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यवसायाची पाळेमुळे आणखी खोलवर असण्याची शक्यता असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.

विविध कंपन्यांद्वारे ‘डीईएफ’चे उत्पादन करून त्यांचे वितरण करण्यासाठी ठिकठिकाणी केंद्रे दिली आहेत. टाटा कंपनीने त्यांच्या ब्रॅन्डचा गैरवापर रोखण्यासाठी इआयपीआर प्रा. लि. या कंपनीची नियुक्ती केली. इआरपीआर कंपनीने तक्रारींची चौकशी केली असता बनावट ‘डीईएफ’च्या विक्रीमुळे अस्सल ‘डीईएफ’ विक्री मंदावल्याचे आढळले.

त्यामुळे तपास करीत कंपनीचे अधिकारी शिरपूरपर्यंत पोचले. हेंद्र्यापाडा येथे बनावट कारखान्यातून ‘डीईएफ’ नाशिक विभागात उपलब्ध करून दिले जात असल्याची खात्री पटल्यावर अधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन तक्रार दिली. त्यांच्या आदेशावरून पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी कारवाई केली.

पोलिस उपअधीक्षक हिरे, सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक गणेश कुटे यांनी गुरुवारी सायंकाळी हेद्र्यापाडा शिवारातील पत्र्याच्या गुदामावर छापा टाकला. नवी कोरी युरिया गाळप यंत्रणा, बकेट प्रिंटिंग मशिन, तसेच नामांकित ब्रँडच्या प्रिंटिंग केलेल्या बादल्या, ड्रम व युरियाचा साठा असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जप्तीची कारवाई पहाटे चारपर्यंत सुरू होती.

कारवाईत पोलिसांनी ५३ लाख २५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इआयपीआर कंपनीतर्फे सागर आबनावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारखान्याचा मालक जयपाल प्रकाश गिरासे (रा. पळासनेर), बोलेरोचालक छन्ना राणा पावरा (वय ३५, रा. हाडाखेड, ता. शिरपूर) व सुरलाल काऱ्ह्या पावरा (२४, रा. नटवाडे, ता. शिरपूर) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

पोलिस अधीक्षक धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक खलाणे, उपनिरीक्षक सुनील वसावे, श्री. कुटे आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT