vari crop esakal
उत्तर महाराष्ट्र

Ranbhaji Mahotsav 2023 : आजपासून वनभाजी महोत्सवास प्रारंभ; भगर काढणीचे मशिनद्वारे प्रात्यक्षिक

भिलाजी जिरे

Ranbhaji Mahotsav 2023 : भरडधान्य, तृणधान्य, श्रीधान्य शरीरासाठी पोषक असून, त्याचा उपयोग पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात होतो. स्तनदा, गर्भवती मातांसाठी हे पोषक अन्न ठरते. बारीपाडा (ता. साक्री) परिसरात यापैकी अनेक पिके घेतली जातात.

बारीपाड्यात शनिवार (ता. २६)पासून सुरू होणाऱ्या वनभाजी स्पर्धा-२०२३ महोत्सवात या धान्याचा स्टॉल आकर्षण ठरेल. या ठिकाणी स्टॉलमध्ये रविवार (ता. २७)पर्यंत भगर काढण्याचे मशिन प्रात्यक्षिकासह पाहता येईल.

आंतरराष्ट्रीय पौ‍ष्टिक तृणधान्य वर्ष-२०२३ निमित्त बारीपाड्यातील दोनदिवसीय महोत्सवात मिलेट्सचे विविध वाण पाहता येईल. (Ranbhaji festival starts from today in baripada dhule news)

भरडधान्य (श्रीधान्य)ला मिलेट्स म्हणतात. यात ज्वारी, बाजरी, नागली, नाचणी, बांधला, राजगिरा, कुटकी, वरी, सावा, बरटी, राळा आदींचा समावेश होतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भरडधान्याला ‘श्रीअन्न’ हा शब्द वापरण्यास सांगितले आहे. भारत हा श्रीअन्नाचा सर्वांत मोठा उत्पादक आणि दुसरा सर्वांत मोठा निर्यातदार आहे.

मिलेट्सचे प्रकार

गहू, भात, मका, राय, ओट, सातू, ज्वारी आणि ज्वारी वर्गातील पिके, बाजरी, नाचणी, वरी, राळा, सावा, कोद्रा व बर्टी आदींचा तृणधान्यांत समावेश होतो. तृणवर्गीय पिकांचा गट जगभरात जनावरांचा चारा आणि मानवी अन्नासाठी पिकविला जातो. पूर्वी काळी उखळ आणि मुसळ वापरून या धान्यावरील साल/साळ किंवा कवच भरडून काढले जात.

यानंतर गरजेनुसार जात्यावर दळून पीठ केले जाते. त्यामुळे यास भरडधान्य असे म्हटले जात. खाण्यासाठी ही धान्ये विशेषकरून पिकवत असे. ज्वारी आणि बाजरला ग्रेटर मिलेट्स म्हणतात. आकाराने बारीक नाचणी, वरी, राळा, कोदो, बर्टी, प्रोसो व ब्राउनटौप ही सर्व मायनर मिलेट्स किंवा बारीक धान्ये म्हणून ओळखली जातात.

सुपर फूडकडे लक्ष

तृणधान्यात तंतुमय पदार्थ असल्याने याकडे ‘सुपर फूड’ म्हणून पाहिले जाते. बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्‍भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे काळाची गरज आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ज्वारी, बाजरी, नागली (नाचणी), वरई, राळा (भादला), राजगिरा, भगर, सावा, बरटी यांसारखी पौष्टिक तृणधान्ये ही कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहेत. पांढरी बर्टी, काळा वा पांढरा भादला व सावा, पिवळसर वरई हा भगरीचा प्रकार आहे. जुलै-ऑगस्टमध्ये लागवड, नंतर मशागत, डिसेंबरमध्ये कापणी केली जाते. पूर्वी भगर उखळीमध्ये कांडली जायची; आता चक्कीत होते.

आजपासून महोत्सव

बारीपाड्यात शनिवारी सकाळी जनजाती योद्धा प्रदर्शनी, श्रीधान्य (भरडधान्य) प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. रविवारी सकाळी अकराला वनभाजी स्पर्धा-२०२३ होईल. रविवारच्या वनभाजी स्पर्धेसाठी मुदतीत २२४ आदिवासी महिलांनी नावनोंदणी केल्याची माहिती जैवविविधता संरक्षण समितीचे अध्यक्ष चैत्राम पवार यांनी दिली.

बारीपाड्याची महती; देशविदेशातून शोधनिबंध

मुंबई, पुणे, ठाणे, सुरत, पलसाणे, शिरपूर येथून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अभ्यासक येणार आहेत. तसेच कॅनडास्थित डॉ. शैलेश शुक्ल, जर्मनीस्थित डॉ. सई हलदुले, औरंगाबादस्थित डॉ. फाटक, तर वीस प्राध्यापकांनी बारीपाड्याच्या परिवर्तनावर शोधनिबंध लिहिले आहेत.

ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, पेरू, बेल्जियम, डेन्मार्क, कॅनडा, इंग्लंडमधील निसर्ग अभ्यासक, देशातील पवई, मुंबई, चेन्नई, खडगपूर (कोलकता), दिल्ली, रुरकी येथील आयआयटीचे विद्यार्थी, राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू आनंद गुजराल, श्री. दापोले, टाटा इन्स्टिट्यूट (तुळजापूर), अझीम प्रेमजी विद्यापीठ (बेंगळुरू) येथील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT