Land esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News: रखडलेल्या रापापुर सिंचन प्रकल्पाचे भाग्य उजळले; 1500 हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार

फुंदीलाल माळी

तळोदा (जि. नंदुरबार) : १९९८ मध्ये मंजुरी मिळालेला व २४ वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या रापापूर सिंचन प्रकल्पाचे लेखाशीर्ष बदलून सरदार सरोवर प्रकल्प, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ व वीज प्रकल्पावरील मोठी बांधकामे या उद्दिष्टाखाली शासनाच्या मंजूर अनुदानातून प्रकल्पाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे सिंचन प्रकल्पाचे रखडलेले काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाच्या कामाला आतातरी पूर्ण निधी मिळावा व कामाला गती येऊन प्रकल्प पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (Rapapur project will go wayside due to change in heading of accounts area of ​​1500 hectares in Taloda taluka will come under irrigation Nandurbar news)

रापापूर लघुपाटबंधारे योजनेतील सिंचन प्रकल्पाला १९९८ मध्ये मंजुरी मिळून मार्च २००३ मध्ये १५ कोटी २२ लख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र भूसंपादन करण्यासाठी लागलेला वाढीव खर्च व प्रकल्पाच्या संकल्पचित्रात बदल झाल्यामुळे योजनेच्या खर्च वाढत होता. त्यामुळे प्रकल्पाचे कामच बंद पडले होते. या प्रकल्पामुळे तालुक्यातील एक हजार पाचशे हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी या प्रकल्पाचे काम सुरू होण्याकरिता शासनाकडे मागणी लावून धरली होती. त्यामुळे २०१७ मध्ये रापापूर सिंचन प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन प्रकल्पाचा अंदाजित खर्च ५८ कोटी सात लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. त्या वेळी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लहान सिंचन योजना व तापी पाटबंधारे विकास महामंडळ व इतर योजनेच्या लेखाशीर्षाखालील असलेल्या शासनाच्या मंजूर अनुदानातून हा खर्च भागविण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र तरीदेखील निधीअभावी प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकले नाही.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

आता २२ नोव्हेंबरला शासनाने रापापूर सिंचन प्रकल्पाच्या मंजूर खर्चासाठी लेखाशीर्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वीज प्रकल्पावरील खर्च, सरदार सरोवर प्रकल्प, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ मोठी बांधकामे या उद्दिष्टाखाली असलेल्या लेखाशीर्षामधून हा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम आतातरी सुरू होऊन प्रकल्पाला वेळेवर पूर्ण निधी मिळावा व प्रकल्प पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा आहे.

चोवीस वर्षांत ३५ टक्के काम!

रापापूर सिंचन प्रकल्प गोऱ्यामाळ टेकडीजवळ असलेल्या नदीवर बांधण्यात येत आहे. २४ वर्षांत या प्रकल्पाचे केवळ ३० ते ३५ टक्के काम झाले आहे. त्यात सांडव्याची भिंत व पिचिंगचे काम झाले आहे. मुख्य भिंतीचे काम होणे बाकी आहे. निधीच मिळत नसल्याने प्रकल्प रखडत होता. आतातरी निधी वेळेवर मिळून प्रकल्पाचे काम सुरू व्हावे, अशी मागणी रापापूरसह अमोनी, रेवानगर, धवळीविहीर, चौगाव, दलेलपूर व तळोदा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT