नाशिक : हैदराबाद आणि उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनांविरोधात देशभर जनक्षोभ उसळला असतानाच, रविवारी (ता. 8) नाशिकमध्येदेखील एका सातवर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नागरिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले असून, अंबड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
अशी घडली घटना...
कैलास कोकणी (वय 27, रा. महालक्ष्मीनगर, अंबड) असे संशयित नराधमाचे नाव आहे. पीडित चिमुकलीचे कुटुंबीय काही दिवसांपूर्वीच या भागात राहावयास आले होते. त्यांच्याच शेजारी संशयित कोकणी राहतो. रविवारी दुपारी पीडित चिमुकली घराबाहेर खेळत होती. त्यावेळी कोकणी याने तिला मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे आमिष दाखवून घराच्या वरच्या खोलीत नेले व घरात कोणीही नसल्याचे संधी साधून आतून दरवाजा लावून घेतला. इकडे पीडित मुलीच्या आईला मुलगी न दिसल्याने तिने शोधाशोध सुरू केली. वरच्या खोलीत राहणाऱ्या कोकणीला विचारण्यासाठी तिने दरवाजा ठोठावला. परंतु संशयित कोकणी दरवाजा उघडत नव्हता. त्यामुळे संशय बळावल्याने आरडाओरड करून त्यांनी आसपासच्या नागरिकांना बोलावत संशयिताला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. त्यावेळी विवस्त्र अवस्थेतील भेदरलेली चिमुकली आईला पाहून बिलगली. संशयिताने तिच्यावर बलात्कार केल्याने नागरिकांनी त्यास चोप देत अंबड पोलिसांच्या हवाली केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरसेवक दीपक दातीर, योगेश वीर, मदन यादव, रत्नदीप कोरी, किरण चौधरी, राजेश जयस्वाल, मनीषा यादव, उत्तर अवनीश यादव, सुदर्शन वेताळ, नवनाथ शिंदे यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...
गुन्हा दाखल करण्यास मात्र विलंब
दरम्यान, देशभरात असलेली सध्याची परिस्थिती पाहता अंबड पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करणे गरजेचे होते; परंतु दुपारी घडलेल्या घटनेप्रकरणी पीडित चिमुकलीसह तिच्या मातेला पोलिसांनी अंबड ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले. एकप्रकारे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु नागरिकांनी दबाव वाढविल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
हेही वाचा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.