Dhule news : वाल्हवे (ता. साक्री) गावात अतिशय दुर्मिळ असलेला ‘पोवळा’ साप आढळला आहे.
आदिवासी शेतकरी पंडित सुका पवार यांच्या घराजवळ जीर्ण लाकडात हा सर्प आढळला असून, श्री. पवार यांचे सर्पमित्र पुत्र तथा माध्यमिक शिक्षक पी. पी. पवार यांनी सापास लगतच्या वनक्षेत्रात सुरक्षित अधिवासात सोडले. (rare povala snake found in valve dhule news)
वाल्हवे परिसरातील वनक्षेत्रात जैवविविधता आजही टिकून आहे. नामशेष होत चाललेले अनेक वन्यजीव या भागात सापडत असल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली. घराजवळील अंगणात इंधनासाठी जीर्ण लाकडू फोडताना हा दुर्मिळ पोवळा साप आढळला.
हा साप शीतरक्तीय प्राणी असल्याचे सर्पमित्र सांगतात. यंदा प्रचंड तापमान असल्याने सर्पासारखे सरपटणारे प्राणी थंड जागेत आश्रय शोधत फिरतात. जुन्या लाकडात आद्रता असल्याने त्या ठिकाणी थंडावा मिळतो. शिवाय दलदल अथवा जुन्या लाकडात ते बसलेले असतात.
सर्वांत लहान सर्प
‘पोवळ्या’ सापाची सर्वांत लहान सर्प म्हणून ओळख आहे. पी. पी. पवार स्वतः इंधनासाठी लाकूड फोडत असताना पोवळा साप दिसला. नेहमीपेक्षा वेगळा असल्याचे आढळले. हा साप दुर्मिळ असून, वाल्हवे परिसरात प्रथमच आढळल्याचे सांगितले जात आहे. विषारी असून, याची लांबी ५४ सेंटिमीटरपर्यंत वाढते. शरीराचा रंग तपकिरी असून, डोके व मान काळी असते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तसेच शेपटीवर दोन काळे आडवे पट्टे असतात. पोटाचा रंग लाल असतो. लांबट सडपातळ शरीर व मऊ खवले असतात. हा साप निशाचर आहे.
तो राज्यातील पश्चिम घाटातील सोलापूर, कोयना, वर्धा, अकोला परिसरात आढळत असल्याची माहिती सर्पमित्र देतात. वातावरण बदलाचा परिणाम सर्वच जीवांवर होत असल्याचे चित्र आहे.
यंदा तर जून उजाडला तरी तापमान चाळिशीच्या वर आहे. प्रचंड तापमानामुळे प्राणी सैरभैर झाले आहेत. जैवविविधता नष्ट होत चालल्याने दुर्मिळ वन्यजीव प्राणी नामशेष होत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी सर्पमित्र पवार यांनी दिवड, मांजऱ्या, नाग, नेण्याटी, मांडूळ आदी सापांना जीवदान देत वनक्षेत्रात सुरक्षित स्थळी सोडले आहे.
आदिवासी भागात जैवविविधता टिकून!
वन विभागाच्या जाचक कायदा आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून आदिवासी भागातील वनक्षेत्रात जैवविविधता आजही टिकून आहे. वाल्हवे परिसरातील वनक्षेत्रात जैवविविधता टिकून आहे. ज्या भागात घनदाट, सुरक्षित वनक्षेत्र आहे अशाच ठिकाणी दुर्मिळ पोवळासारखा साप आढळून येत आहे.
साप दुर्मिळ असल्यामुळे त्याचे दंशाचे प्रमाणही कमी असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली. याचा दंश झाल्यास त्या ठिकाणी जळजळ होऊन सूज येणे व श्वास घेण्यास अडचण होणे ही लक्षणे दिसून येतात.
"पोवळ्या सापाचे दंश होण्याचे प्रमाण नगण्य असते. दंशामुळे मृत्यूचे प्रमाण कमी असून, साप आकाराने लहान असल्याने दातही नाजूक, लहान असतात. विषबाधेचे प्रमाणही नगण्य असते." -पी. पी. पवार, सर्पमित्र, वाल्हवे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.