SSC Re Exam 2023 : दहावीची पुनर्परीक्षा येत्या १८ जुलैपासून सुरू होत असून, त्यासाठी नंदुरबार व नवापूर तालुक्यांतील पुनर्परीक्षार्थींची बैठक व्यवस्था नंदुरबार येथील यशवंत विद्यालयात करण्यात आली आहे. (re examination of class 10 will start from July 18 nandurbar news)
मार्च २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने जाहीर केली आहे. १८ ते ३१ जुलैदरम्यान ही परीक्षा होत आहे. त्यासाठीची बैठक व्यवस्था जाहीर झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तसेच परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. ही परीक्षा मराठी, इंग्रजी, गुजराती माध्यमांसाठी आहे. संबंधित माध्यमांच्या परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा केंद्र संचालक एस. वाय. पाटील यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.