Dhule News : मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाईसाठी गेल्यानंतर तीन थकबाकीदारांनी कारवाई पथकाकडे थकबाकीचे धनादेश सुपूर्द केले. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली. या कारवाईतून सुमारे सहा लाख रुपये थकबाकी वसूल झाली.
शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे महापालिकेची कोट्यवधी रुपये थकबाकी आहे. (Recovery of 6 lakh from defaulters dhule news)
यात रहिवासी मालमत्ताधारकांसह व्यावसायिक मालमत्ताधारकांचाही समावेश आहे. व्यावसायिक मालमत्ताधारक एकीकडे आपला व्यवसाय करतात. महापालिकेचा कर भरायला मात्र पुढे येत नाहीत, महापालिकेतर्फे नोटिसा बजावल्या जातात, कारवाईचा इशारा दिला जातो. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही.
त्यामुळे कमी मनुष्यबळ असलेल्या महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून अधूनमधून कारवाई होताना पाहायला मिळते. अनेक ठिकाणी थकबाकीदारांच्या मालमत्ता कारवाई पथकाकडून सील करण्यात येतात.
दरम्यान, गुरुवारी (ता. २३) महापालिकेचे कारवाई पथक तीन ठिकाणी गेले. या तिन्ही ठिकाणी संबंधित थकबाकीदारांनी कारवाईच्या धाकाने का होईना थकबाकी अदा केली. किरण दिनकर पाटील भोगवटादार कॅनरा बँक यांच्याकडून पथकाने तीन लाख ११ हजार १७९ रुपयांचा धनादेश मिळाला.
तसेच अवधान येथे जितेंद्र रामपाल व्होरा यांच्याकडे कारवाईसाठी पथक गेले. तेथूनही पथकाला श्री. व्होरा यांच्याकडून दोन लाख रुपयांचा धनादेश थकबाकीपोटी मिळाला. अवधान येथूनच हरभजनसिंग पंजाबी यांच्याकडून कारवाई पथकाला थकबाकीपोटी ८३ हजार ४९० रुपयांचा धनादेश प्राप्त झाला.
वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली अधीक्षक मधुकर निकुंभ, निरीक्षक मनोज चिलंदे, पंकज शर्मा, मनीष ठाकरे, श्री. मराठे, अशोक सूर्यवंशी, गोरख सरगर, सुनील गढरी, प्रसाद चाले यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.