Nandurbar News: खोदकाम करताना रस्ते, पाण्याचे नळ, मलनिस्सारण वाहिन्या, दूरसंचार पायाभूत सुविधा, विद्युत वाहिन्या, गॅस वाहिन्या, ऑप्टिकल फायबर केबल्स या सेवांचे नुकसान व त्यामुळे नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी खोदकाम करण्यापूर्वी खोदकाम करणाऱ्या संस्था व मालमत्ताधारक विभागांना Call Before you Dig (कॉल बीफोर यू डिग) या ॲप प्रणालीवर नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे या सर्व विभागांचा समन्वय राखला जाऊन नागरिकांना होणारा त्रास टाळता येणार आहे. (register on call Before you Dig app system before digging nandurbar news)
पायाभूत सुविधांची उभारणी करताना मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते. या उत्खननामुळे त्या ठिकाणी आधीच अस्तित्वात असलेल्या इतर पायाभूत सुविधांना हानी पोचते. यामुळे मालमत्ता व सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, तसेच सेवांचा पुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय होते. उत्खनन करणाऱ्या विविध संस्थांमध्ये ताळमेळ ठेवण्यासाठी दूरसंचार विभागाने ‘कॉल बीफोर यू डिग’ या प्रणालीची निर्मिती केली आहे.
या प्रणालीद्वारे उत्खनन संस्था आणि पायाभूत सुविधा मालमत्ताधारक विभाग यांच्यात समन्वय व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करत असताना करावयाच्या खोदकामासाठी मालमत्ताधारक विभाग व खोदकाम करणाऱ्या संस्थांना कॉल बीफोर यू डिग या प्रणालीवर नोंदणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यानुसार नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग विभाग, वन विभाग, परिवहन व बंदरे गृह विभाग, ऊर्जा विभाग, जलसंपदा विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग या विभागातील ज्या ठिकाणी उत्खनन करावयाचे आहे अशा मालमत्तेशी संबंधित व्यक्ती, संस्था, प्राधिकरणे, कार्यालय यांच्या परवानगीनंतर खोदकाम करू इच्छिणाऱ्या कोणत्याही संबंधितांनी खोदकामाची नोंदणी करून पूर्वसूचना द्यावयाची आहे.
यासाठी अँड्रॉइड मोबाईल भ्रमणध्वनीमध्ये ॲप स्टोअरमधून कॉल बीफोर यू डिग हे ॲप्लिकेशन डाउनलोड करता येणार आहे. या सुविधेमुळे खोदकाम करत असताना पाण्याचे नळ, मलनिस्सारण वाहिन्या, दूरसंचार विभागाच्या केबल, ऑप्टिकल फायबर केबल या सेवांचे नुकसान टळणार आहे व नागरिकांनादेखील निर्माण होणारी असुविधा टाळता येणार असल्याने या निर्णयाचे सामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.
असुविधांना आळा बसणार
अनेकदा शहरांत खोदकाम होत असताना इतर विभागांना माहिती दिली जात नाही. त्यामुळे पाण्याची पाइपलाइन फुटणे, दूरसंचार कंपनीच्या केबल तुटणे, मलनिस्सारण पाइपलाइन फुटणे अशा घटना घडत असतात. त्यामुळे पाण्याची नासाडी, दूषित पाणी पसरणे, दूरसंचार यंत्रणा ठप्प पडणे या असुविधा निर्माण होतात. त्यामुळे या ॲपमुळे सर्व विभागांमध्ये समन्वय राहून असुविधांना आळा बसणार आहे..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.