कापडणे : जागतिक बाजारात तेलबियांचा तुटवडा आहे. सोयाबीनचे दर वाढले असले तरी, भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने सोयाबीनच्या वायदेबाजारावर बंदी लादू नये.
सोयाबीन प्रक्रिया उद्योग लॉबीकडून सोयाबीनचा वायदे बाजार बंद करण्याचे दडपण सरकारवर येत असले तरी शेतकरी हित लक्षात घेऊन वायदे बाजारावर बंदी घालणे फायदेशीर ठरणार नाही. तरीही का बंदी लादत आहात. दुसरीकडे तूर, चना, गहू व कपासावरील बंदी हटविण्याची मागणी शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन करून केली. (Remove ban on soybean futures Agitation of Farmers Association Demands not to ban through a statement to District Collector Dhule News)
मागील हंगामात निकृष्ट बियाणे व अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी १०० टक्के नुकसान झाले असले तरी सरासरी तीस ते पस्तीस टक्के नुकसान झालेले आहे. वाढीव दरामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार नाही.
तर फक्त झालेली नुकसान भरून निघेल. सोयाबीन प्रक्रिया उद्योग लॉबीकडून सोयाबीनचा वायदे बाजार बंद करण्याचे दडपण सरकार वर येत असले तरी शेतकरी हीत लक्षात घेऊन वायदे बाजारावर बंदी घालणे फायदेशीर ठरणार नाही.
वायदे बाजारावर बंदी घातल्यास कच्चा माल स्वस्तात मिळेल. काही प्रक्रिया उद्योगांना अवाजवी नफा कमावण्याची संधी मिळेल. वायदे बाजार बंद केल्यास सोयाबीनच्या किमती कोसळतील. शेतकऱ्यांना चांगले दर मिळाल्यास शेतकरी तेलबियांचे अधिक उत्पादन काढतील.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, विभागीय अध्यक्ष शशिकांत भदाणे, माजी अध्यक्ष आत्माराम पाटील, शांतूभाई पटेल, भटू अकलाडे, ठाकरसिंग गिरासे, भटू पाटील, नारायण माळी, भगवान पाटील, रामदास जगताप, पृथ्वीराज पाटील, बाबूराव शिरसाठ, केवळ माळी, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र वाणी आदी सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.