Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipal Corporation: बांधकाम साहित्य, अवैध बॅनर तत्काळ हटवा; समाजकंटकांकडून गैरवापर झाल्यास सहआरोपी करू

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipal Corporation News: आगामी सण-उत्सवांच्या काळात शहरातील प्रमुख रस्ते, मुख्य चौक, मिरवणूक मार्गावरील बांधकाम साहित्य संबंधितांनी तेथून हटवावे तसेच अवैध बॅनर/पोस्टर्सही संबंधितांनी काढून घ्यावीत.

मिरवणूक मार्गावरील दगड-विटांचा समाजकंटकांकडून अस्त्र-शस्त्र म्हणून वापर झाल्यास बांधकाम साहित्य असलेल्या संबंधितांना सहआरोपी करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. (Remove construction materials illegal banners immediately In case of abuse by social workers we will co accused Dhule Municipal Corporation)

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर यांनी याबाबत प्रकटन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात त्यांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणासह बांधकाम साहित्य हटविण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील प्रमुख रस्ते, मुख्य चौक, मिरवणूक मार्गावरील अवैध बॅनर/पोस्टर, रस्त्यावरील बांधकाम साहित्य तसेच मोकाट गुरे व वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण संबंधित नागरिकांनी तत्काळ काढून घ्यावे.

तसेच मिरवणूक मार्गावरील बांधकाम साहित्यामुळे मिरवणुकीत काही समाजकंटकांनी वादविवाद केल्यास, पडलेल्या विटा, दगड यांचा अस्त्र, शस्त्र म्हणून वापर झाल्यास संबंधित साहित्य टाकणाऱ्यांना सहआरोपी करण्यात येईल व महाराष्ट्र महापालिका अधिनियम व महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे सर्व बांधकामधारकांनी रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य गणेशोत्सवापूर्वी काढून घ्यावे तसेच अवैध पोस्टर/बॅनर संबंधितांनी तत्काळ काढून घ्यावे तसेच मोकाट गुरेधारकांनी आपली गुरे-ढोरे आपल्या जागेत बांधावीत व धुळे महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे उपायुक्त डॉ. नांदूरकर यांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

समस्या जुनीच

शहरात रस्ते, चौकात बांधकाम साहित्य टाकल्याने रहदारीला अडथळा निर्माण होण्याची समस्या नवीन नाही. अनेक ठिकाणी महिनोन महिने असे साहित्य पडून असते. त्यामुळे समस्या निर्माण होतात.

याशिवाय अनेक ठिकाणी रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्‍नही गंभीर आहे. तसेच मोकाट गुरांमुळे निर्माण होणाऱ्या रहदारीला अडथळा ही समस्यादेखील जुनीच आहे. दरम्यान, सण-उत्सवांच्या काळात महापालिकेकडून याबाबत उपाययोजना होतात.

आताही विशेषतः मोकाट गुरांबाबत महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, आता सण-उत्सवात निघणाऱ्या मिरवणुकांना अडथळे निर्माण होऊ नयेत यादृष्टीनेही महापालिकेचे उपाययोजनेचे प्रयत्न आहेत.

त्याच अनुषंगाने रस्ते, चौकातील बांधकाम साहित्य संबंधितांनी हटवावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, केवळ आवाहनाने ही समस्या दूर होणारी नाही. त्यामुळे किमान आता सण-उत्सवांच्या काळात महापालिकेच्या यंत्रणेने याबाबत लक्ष घालून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT