Dhule News : शहरातील शिवाजी रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिर मागील पांझरा नदी पात्रात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचे काम अंतिम टप्यात आहे. दरम्यान, श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त धुळ्यात २१ ते ३१ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात २१ जानेवारीला शोभायात्रा निघेल अशी माहिती अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. (replica of Shri Ram temple in Panjra river dhule news)
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे.
मात्र, धुळेकरांना श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद मिळावा, यासाठी श्री.अग्रवाल यांच्या संकल्पनेतून पांझरा नदीपात्रात आयोध्या नगरी उभारण्यात येत आहे. या ठिकाणी श्रीराम मंदिराची ६० फूट उंच, ६५ फूट रुंद व ११० फूट लांब प्रतिकृती आहे. दरम्यान, २१ ते ३१ जानेवारीदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होतील.
विविध कार्यक्रमांचे नियोजन
प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २१ जानेवारीला आग्रारोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून श्रीराम मूर्तीची शोभायात्रा काढण्यात येईल.
आग्रा रोडमार्गे गांधी पुतळा- अयोध्या नगरी पंचमुखी हनुमान मंदिर, पांझरा नदीपर्यंत ही यात्रा निघेल. २२ जानेवारीला दुपारी बाराला श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
त्याच दिवशी रात्री आठवा दीपोत्सव, साडेआठला लाइट शो व आतषबाजी करण्यात येईल. २३ जानेवारीला रात्री आठला रामदेव बाबा भजनी मंडळातर्फे भजन संध्या, २४ जानेवारीला रात्री आठला शिरपूर येथील गोल्डन बॅण्ड यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम.
२५ जानेवारीला रात्री आठला पुणे येथील आनंद माडगुळकर व अभिजित पंचभाई यांचा गीत रामायण कार्यक्रम, २६ जानेवारीला रात्री आठला इंडियन ऑयडॉल फेम जगदीश चव्हाण यांचा देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम, २७ जानेवारीला रात्री आठला ऋषीकेश रिकामे यांचा संगीतरजनी कार्यक्रम होईल.
२८ जानेवारीला रात्री आठला भजन सम्राट अनुप जलोटा यांचा भजनसंध्या कार्यक्रम होईल. २९ जानेवारीला रात्री आठला रामभक्ती जल्लोष कार्यक्रम होईल. ३० जानेवारीला रात्री आठला मुंबई येथील गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा श्रीराम गीतांचा कार्यक्रम होईल.
दरम्यान २३ ते ३० जानेवारीदरम्यान रोज सायंकाळी साडेसातला महाआरती होईल. ३१ जानेवारीला सायंकाळी साडेसहाला अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित साधू संतांच्या उपस्थितीत धर्मसभा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.