निमगूळ (जि.धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील २३ गावांना विहीर अधिग्रहणाचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. मोबदला त्वरित मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शिंदखेडा तालुक्यात नेहमी दुष्काळाचे सावट असते. तालुक्यात बागायत क्षेत्र कमीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीतच दर वर्षी मार्च महिन्यापासून ते ऑगस्टमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर समस्या वर्षानुवर्षे भेडसावत आहे.
गावातील लोकप्रतिनिधी व शासन नियमाप्रमाणे ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई असते त्या गावांना गावातील लोकप्रतिनिधींची मदत घेत गावानजीक तसेच सोयीस्कर ठिकाणी विहिरीचे अधिग्रहण शासनाच्या देयकानुसार केले जाते. (Resentment among farmers due to lack of compensation for well acquisition Situation in 23 villages of Shindkheda taluka Dhule News)
शेतीचे उत्पन्न बाजूला सारत शेतकरी गावाची समस्या असल्याने स्वतःचा रब्बी हंगाम सोडून स्वतःचे नुकसान सहन करतो. शासनाच्या देयकावर विश्वास ठेवून त्याला दोन वर्षांपर्यंत विहीर अधिग्रहणाचा मोबदला अनुदान मिळत नाही. मोबदला न मिळाल्याने व रब्बी हंगामाचे नुकसान होते.
असे असताना या वर्षी मोबदला न मिळाल्याने शेतकरी पाणी देण्यास तयार नसून उन्हाळ्यात गावातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल मोठ्या प्रमाणावर होतील म्हणून संबंधित विभागाने लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करून पाणीटंचाईची समस्या सोडवावी, अशी मागणी सरपंच महा सेवासंघ जिल्हाध्यक्ष तथा सोनशेलू सरपंच प्रियंका बडगुजर यांनी केले आहे. या प्रकरणी कोणावर काय कारवाई होते, मोबदला कसा व केव्हा दिला जातो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मोबदला न मिळालेली गावे
मागील २०२१-२२ वर्षीचे शिंदखेडा तालुक्यात सोनशेलू, विखरण, सवाईमुकटी, चुडाणे, सुराये, रुदाने, कर्ले, जोगशेलू, मांडळ, अंजनविहिरे, चौगाव खुर्द, खलाणे, चौगाव बुद्रुक, दरखेडा, खर्दे बुद्रुक, जातोडा, मेथी, वाडी, वरझडी, देवी, सुलवाडे अशा २३ गावांतील पाणीटंचाईचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मागील वर्षापासून मिळालेला नाही.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
"ग्रामपंचायतीतर्फे प्रस्ताव पाठविला जातो. त्यानुसार देय बिल देण्यात येते. मात्र प्रस्ताव आला नाही तर मोबदला अनुदानाचे देय बिल देऊ शकत नाही." -डी. एम. पाटील,गटविकास अधिकारी, शिंदखेडा
"तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षाचा अधिग्रहण मोबदला मिळाला नाही, तसेच तालुक्यातील पाच गावांना दोन वर्षांचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी असून, तत्काळ मोबदला मिळावा."
-प्रियंका बडगुजर,जिल्हाध्यक्षा, सरपंच महसेवा संघ व सरपंच, सोनशेलू
"आम्ही फक्त अधिग्रहणाचा आदेश करतो. अनुदान पंचायत समितीकडून मिळत असते त्यांनी याबाबत पत्रव्यवहार करून अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करावा."
-आशा गांगुर्डे, तहसीलदार, शिंदखेडा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.