Lieutenant Rajshekhar Jadhav with his parents esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : रिक्षाचालकाचा मुलगा ‘लेफ्टनंट’पदी विराजमान

रमाकांत घोडराज

धुळे : शहरातील एका रिक्षाचालकाच्या (Rikshaw Driver) मुलाने एनडीएची परीक्षा (NDA Exam) व खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आर्मीमध्ये लेफ्टनंटपदी (Army Lieutenant) विराजमान होण्याचा बहुमान मिळविला आहे. राजशेखर सुरेश जाधव असे या तरुण अधिकाऱ्याचे नाव आहे. या यशाबद्दल राजशेखरसह त्याच्या आई-वडिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (rickshaw Drivers son Rajshekhar Jadhav become lieutenant Dhule Success story News)

राजशेखर धुळे शहरातील मिल परिसरातील साने गुरुजी हाउसिंग सोसायटीतील रहिवासी आहे. त्याचे वडील सुरेश जाधव रिक्षाचालक तर आई कमलबाई जाधव या जिल्हा रुग्णालयात परिचारिका आहेत. राजशेखरचे प्राथमिक शिक्षण शहरातील कनोसा विद्यालयात झाले. त्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण औरंगाबाद येथील सर्विसेस प्रिपरेटरी इंस्टिट्यूट येथून पूर्ण केले. हे शिक्षण घेत असतानाच त्याची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एनडीएसाठी निवड झाली. खडकवासला पुणे येथील प्रबोधिनीमध्ये तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्याची लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली. डेहराडून येथे आयएमएमध्ये परीक्षाविधीन कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी राजशेखर ८ जुलै २०२२ ला डेहराडूनला रवाना होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT