तळोदा (जि. नंदुरबार) : तळोदा शहरातील मेन रोडवरील रस्त्याचे काम करण्यात येत आहे. मात्र रस्त्यांचे काम संथ गतीने करण्यात येत असल्याने या परिसरातील व्यापाऱ्यांना व नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे अशी मागणी तळोदा व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली. (road work being done slowly by Municipal Corporation traders citizens of area facing great difficulties nandurbar news)
याबाबत नगर पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सपना वसावा यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, की शहरातील मेन रोडवरील मुरलीधर मंदिर ते स्मारक चौक पर्यंत रस्त्याचे काम २५ डिसेंबर पासून सुरु करण्यात आले आहे.
मात्र आजपर्यंत झालेल्या कामावरून सदर काम हे संथ गतीने होत आहे, तसेच या कामात नियोजनाच्या अभाव असल्याचे निर्दशनास येत आहे. साधारणतः एक महिन्यांपासून सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
असे निवेदनात म्हटले आहे. या प्रसंगी, तळोदा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आनंद सोनार, सुभाष चोपडा, मुकेश वाणी, राजेंद्र कोचर, मनोज भामरे, हंसू भंडारी, मुकेश जैन आदी उपस्थित होते.
हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.