A farmer turning a rotavator on a papaya crop.  
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News: पपईच्या बागेवर फिरवले रोटाव्हेटर; पिकाला भाव नसल्याचे उचलले पाऊल

परिवर्धा (ता. शहादा) येथील प्रल्हाद पाटील यांनी आपल्या चार एकर क्षेत्रामध्ये पपईची लागवड केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Agriculture News : जिल्ह्यात सर्वाधिक पपईची लागवड शहादा तालुक्यात करण्यात आली आहे. लाखो रुपये खर्च करूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादन खर्च निघणेही दुरापास्त झाल्याने परिवर्धा (ता. शहादा) येथील शेतकऱ्याने चार एकरावरील पपई पिकावर रोटाव्हेटर फिरविला.

परिवर्धा (ता. शहादा) येथील प्रल्हाद पाटील यांनी आपल्या चार एकर क्षेत्रामध्ये पपईची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना एकरी ८०ते ९० हजार रुपयांचा खर्च झाला. ( rotavator rotated over papaya orchard nandurbar news)

मात्र आता पपई काढणीला आली असताना पपईला मागणी कमी असल्याचे कारण दाखवत व्यापारी पपई तोडण्यास असमर्थता दाखवत असल्याने आणि मिळत असलेला अत्यल्प दरात खर्च निघणेही दुरापास्त झाल्याने पपईची शेती करणे परवडत नसल्याने शेतकऱ्याने अखेर पपईच्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्यास सुरवात केली. अगोदरच पपईवर असलेल्या विविध विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत होता आता व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक लागवड

देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे. मात्र उत्तरेकडील राज्यांमध्ये पपईची मागणी कमी झाल्याने व्यापारी पपई खरेदी करत नसल्याची स्थिती आहे. तर दुसरीकडे व्यापारी मनमानी करून तीन ते पाच रुपये किलोचा दर देत असल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी पपईच्या शेतावर रोटाव्हेटर फिरवत असल्याची स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

शासनाने लक्ष द्यावे

पपईचे दर ठरवण्यासाठी सरकारच्यावतीने एक समिती नेमण्यात यावी आणि त्याच्याच माध्यमातून पपईचे दर ठरविण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना परवडणारे दर मिळतील. मात्र पपईचे दर ठरविण्यासाठी अशी कुठलीही समिती नाही व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून ठरवलेली समन्वय समिती हे दर ठरवत असतात. मात्र सरकारचं पपई उत्पादक शेतकऱ्यांकडे होणाऱ्या दुर्लक्ष जिल्ह्यातून पपई नामशेष होण्यास कारणीभूत ठरू शकते.

"नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पपई लागवड केली जात असते. उत्तरेकडील व्यापारी पपई खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र यावर्षी मागणी कमी असल्याने दर मिळत नसल्याचे चित्र आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा पपई, केळी उत्पादक बागायतदार संघ व व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक लावून दरासंबधी तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पपईवर रोटाव्हेटर मारण्याचा निर्णय घेऊ नये." -अभिजित पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT