Dhule News : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची सोडत ५ एप्रिलला जाहीर झाली. (RTE Admission applications received more than 3 times this year In Dhule Nandurbar district dhule news)
प्रवेश जाहीर मुलांना १३ एप्रिलपासून प्रवेश निश्चित करता येत आहे. प्रवेशाची अंतिम मुदत ३० एप्रिल आहे. तथापि, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात या वर्षी एकूण जागांच्या तिपटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार ३१६ जागांसाठी चार हजार ९६० म्हणजेच प्रवेश क्षमतेच्या तिपटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील ९३ शाळांमध्ये आरटीईच्या एक हजार सहा जागांसाठी तीन हजार ७१२ विद्यार्थ्यांचे, तर नंदुरबार जिल्ह्यातील ४५ शाळांमध्ये ३१० जागांसाठी एक हजार २४८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर १२ एप्रिलला दुपारी तीनपासून प्रवेशाचे लघुसंदेश पाठविण्यात येत आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत आरटीईची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यंदा आरटीईसाठी विक्रमी अर्ज आले आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेश निवडीसाठी सोडत काढण्यात आली.
निवड झालेल्या मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना १२ एप्रिलला दुपारी तीनपासून मोबाईलवर मेसेजद्वारे कळविण्यात येत आहे. नंतर ३० एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष प्रवेशासाठी मुदत देण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी पालकांना २५ एप्रिलपर्यंत पाल्यांच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी समितीकडून तपासणी झाल्यावर प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. आरटीई ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला १ मार्चपासून सुरवात झाली, तर ऑनलाइन अर्जांसाठी अंतिम मुदत २५ मार्च होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.