कापडणे (जि. धुळे) : ‘एकुलत्या राहुलला ब्लड कॅन्सरने पालक हतबल’ या आशयाची बातमी ‘सकाळ’मध्ये शनिवारी (ता. २५) प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत.
अहिराणी साहित्यिक परिवारानेही मदत देऊ केली आहे. राहुल शिकत असलेल्या गंगामाई महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकही मदत निधी संकलित करत आहेत. गेल्या दोन दिवसांत त्याला चाळीस हजारांवर मदत जमा झाली आहे. (SAKAL Impact News Many to help Rahul patil suffering from blood cancer dhule news)
अहिराणी साहित्यिक रामदास वाघ, कैलास भामरे (लासलगाव), प्रवीण लोहार, प्रशांत सहादू, संगीता निकुंभ, तानाजी शिंदे, प्रवीण माळी, सुदाम महाजन, मोहन कवळीदकर, सुभाष उमरकर, गणेश पवार, सरिता कलढोणे, भिला सोनू पाटील, डॉ. सूर्यवंशी, दत्तात्रय चौधरी, राजेंद्र रामदास पारधी, बापू हटकर,
रामेश्वर बहारे, श्याम राजपूत, नानाभाऊ माळी (पुणे), अशोक शिंदे, मगन सूर्यवंशी (डोंबिवली), कविता बाविस्कर (शिरपूर), संजय सोनार (नवसारी), संजयभाई एकनाथ, विठ्ठल अशोक साळुंखे, विश्राम बिरारी, देवदत्त बोरसे, गीतांजली कोळी, राजेंद्र पाटील (दहिवदकर), कैलास चव्हाण व नारायण माळी यांनी प्रत्येकी पाचशेपासून ते दोन हजारांपर्यंतची मदत बॅंक खात्यात थेट जमा केली आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
‘मी पुणेकर, मी कापडणेकर’ ग्रुपमधील योगेश रामराव पाटील, महेंद्र पाटील, चंद्रकांत शिंदे. चेतन पाटील, पराग पाटील, प्रवीण भामरे, वसंत पाटील, दिव्या पाटील, महेश माळी, रवींद्र पाटील व डॉ. दिलीप पाटील आदींनी मदत खात्यात वर्ग केली आहे.
मदतीसाठी संपर्क असा
राहुल पाटीलवरील उपचारासाठी पंधरा ते वीस लाखांची मदत हवी आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन पाटील व मित्र परिवाराकडून केले आहे. मदतीसाठी खाते क्रमांक असा ः दिलीप हिरामण पाटील (९६७३३ ८९८७३ ), बँक ऑफ महाराष्र्ट : ६०१०८६६५५१५
IFSC : MAHB0000544, फोन पे : 9158243548 ( राहुल दिलीप पाटील)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.