नाशिक : गतवर्षी नाशिकसह राज्यात स्वाईन फ्ल्युबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि त्यात वाढत जाणाऱ्या बळींनी कहर केला होता. अक्षरश: आरोग्य यंत्रणेची झोप उडाली होती. मात्र त्यानंतर राबविण्यात आलेल्या उपाययोजना आणि मोठ्याप्रमाणात औषधपुरवठा करण्यात आल्याने यंदा त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. गेल्या 10 महिन्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्युसदृश्य सुमारे 6 लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 10 हजार बाधित रुग्णांवर उपचार केले गेले. तरीही, 56 जणांचा बळी स्वाईन फ्ल्युच्या तापाने घेतला असून, सर्वाधित बळी हे नाशिकमध्ये 39 गेले आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह जळगाव, धुळे, नंदूरबार, अहमदनगर याच पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्वाईन फ्ल्यु चिंतेचा विषय ठरतो आहे. विशेषत: एप्रिल ते जून आणि त्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये वातावरण बदलाच्या विपरित परिणामाचा स्वाईन फ्ल्युच्या विषाणूला पोषक वातावरण तयार होते. परिणामी त्याचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतो. तीव्र ताप, सदी-खोकला होऊन, वेळीच औषधोपचार न झाल्यास दोन दिवसात रुग्ण दगावतो. गेल्या वर्षी 2018 मध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पुण्यात स्वाईन फ्ल्युचा कहर झाला होता. सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतरही आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र होते.
शासकीय "गाईडलाईन' कार्यशाळा ठरली प्रभावी
आरोग्य यंत्रणेने सामाजिक जनजागृतीसह टॉमीफ्ल्यु या गोळ्या थेट प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यत पोहोच केल्या. तर महत्त्वाचे ठरली ती शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसह शहर-ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांसाठीची गाईडलाईन कार्यशाळा. अशा कार्यशाळा घेऊन खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना स्वाईन फ्ल्युसंदर्भात विशेष मार्गदर्शन करून त्यानुसारच उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच शहरांतील मोठ्या हॉस्पिटल्समध्ये बळींची संख्या अधिक असल्याने त्यांनाही उपचाराचे निर्देश दिल्या, तर काही हॉस्पिटल्सवर आरोग्य उपसंचालकामार्फत कारवाईचा बडगाही उगारला गेला. तसेच स्वाईन फ्ल्युचे बळी रोखणे हाच प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सुमारे 6 लाख रुग्णांची तपासणी
तीव्र ताप, सर्दी-खोकला ही स्वाईन फ्ल्युची लक्षणं. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये 5 लाख 88 हजार 526 रुग्णांची स्वाईन फ्ल्युची तपासणी करण्यात आली आहे. तर स्वाईन फ्ल्युची लागण झालेल्या 10 हजार 498 रुग्णांना टॉमीफ्ल्युच्या गोळ्या देत त्यांना बरे करण्यात आले. असे असले तरी 56 जणांचा बळी गेल्या 10 महिन्यात गेला आहे. सर्वाधिक तपासणी ही नाशिकमध्ये 2 लाख 4 हजार 453, नगरमध्ये 1 लाख 84 हजार 967 रुग्णांची केली गेली तर, सर्वाधिक स्वाईन फ्ल्युसदृश्य रुग्ण 9 हजार 455 रुग्णांपैकी 328 बाधित रुग्ण नाशिक जिल्ह्यात निष्पन्न झाले आहेत. नाशिकमध्ये 39 तर नगरमध्ये 27 बळी स्वाईन फ्ल्युच्या विषाणूने घेतले आहेत.
स्वाईन फ्ल्युला आळा घालण्यासाठी खासगी डॉक्टर्स, हॉस्पिटल्ससाठी शासकीय गाईडलाईननुसारच उपचाराचे निर्देश दिले. उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी स्वत: हॉस्पिटल्सची तपासणी करून त्यांना "प्रॉपर ट्रिटमेंट'च देण्याचे आदेश दिले. तर काही केस स्टडी करून काही हॉस्पिटल्सवर कारवाईही केली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले.
- डॉ. अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी, नाशिक जिल्हा.
उत्तर महाराष्ट्रातील आकडेवारी
जिल्हा रुग्ण तपासणी स्वाईन फ्ल्युसदृश्य स्वाईन फ्ल्युबाधित बळी
अहमदनगर 184967 997 52 10
धुळे 100473 20 7 01
जळगाव 90641 21 21 06
नंदूरबार 7992 05 00 00
नाशिक 204453 9455 328 39
एकूण : 588526 10498 408 56
गत पाच वर्षातील नाशिकची आकडेवारी
वर्ष स्वाईन फ्ल्युबाधित बळी
2019 (ऑक्टोबरअखेर) : 328 39
2018 : 493 76
2017 : 529 91
2016 : 16 4
2015 : 508 87
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.