Sanjay Barkund esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : चौकशीस तक्रारदार आमदार शाह 6 वेळा राहिले अनुपस्थित : संजय बारकुंड

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहराचे आमदार फारूक शाह यांनी पोलिस प्रशासनाविरुद्ध वेळोवेळी तक्रारींचे अर्ज दिले. याकामी शासनाकडून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे चौकशी सोपविली गेली. त्यांनी सहा वेळेस आमदार शाह यांना चौकशीकामी बोलविले.

मात्र ते उपस्थित राहिले नाहीत, अशी भूमिका मांडत जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शनिवारी (ता. २८) आमदार शाह यांनी केलेल्या विविध आरोपांचे खंडन केले.( Sanjay Barkund statement of Complainant MLA Shah remained absent for inquiry dhule news)

पोलिस अधीक्षक बारकुंड म्हणाले, की चौकशीकामी पत्र दिले असता आमदार शाह यांच्या सांगण्यानुसार नाशिक नको, धुळ्यात चौकशी व्हावी, धुळ्यात चौकशीस बोलविले तर मंगळवारी (ता. ३१) उपस्थित राहणे शक्य नसून ४ नोव्हेंबरला येतो, असे त्यांनी कळविले आहे.

आमदारांचे ३४ अर्ज

आमदार शाह यांनी जून २०२१ ते जुलै २०२३ पर्यंत पोलिस प्रशासनाविरोधात तक्रारींचे ३४ अर्ज दिले. त्यावर चौकशीअंती तथ्य आढळलेले नाही, असा अहवाल शासनाला पाठविला आहे. या कालावधीत असलेल्या प्रत्येक पोलिस अधीक्षकांकडे त्यांनी एकसारखा तक्रार अर्ज दिला, त्यात केवळ पोलिस अधिकाऱ्याचे नाव बदलले आहे.

या प्रकारासह चौकशीकामी उपस्थित न राहणे यातून आमदार शाह यांच्याकडून पोलिस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न दिसतो. अर्जदाराकडून पोलिसांना त्रास व्हावा, पोलिसांवर आपलाच वचक राहावा, असे त्यांच्या कृतीतून दिसून येते.

अर्जात मोघम मुद्दे

आमदार शाह यांच्या तक्रार अर्जात मोघम, सुस्पष्ट असे मुद्दे दिसत नाहीत. जिल्हा पोलिस अधीक्षक कर्तव्य बजावत नाहीत, असे आमदारांचे म्हणणे आहे; परंतु वर्षभराच्या अखेरीस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवलेला नाही. क्राइम कंट्रोलमध्ये आहे.

त्यामुळे आमदारांच्या आरोपांचे खंडन करतो, असे सांगत पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी आमदार शाह यांच्यावर प्राप्त फिर्यादीनुसार एक गुन्हा दाखल केल्याने त्यांच्याकडून पोलिस प्रशासनावर आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलिसांवर दबाव नाही

पोलिसांपुढे कुठलाही पक्ष, गट-तट समान असतात. कायद्यापुढे सर्व समान असतात. त्यामुळे कुणाच्या दबावाखाली कामकाज करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. ड्रग्जमाफिया ललित पाटील याच्या नाशिक शहरातील प्रकरणाबाबत आमदार शाह यांनी तपास यंत्रणेला पुरावे द्यावेत. धुळे जिल्हा पोलिस प्रशासनाकडेही पुरावे उघड केल्यास हरकत नाही, अशी भूमिका श्री. बारकुंड यांनी मांडली.

फिर्यादीचीच मागणी

चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात टिपू सुलतान स्मारक प्रकरणी १९ जूनला फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला. त्यात तणाव निर्माण करण्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर फिर्यादीने पोलिस प्रशासनास दिलेले निवेदन व त्याच्या पुरवणी जबाबानंतर कलम १२० ब, ४०९ व लाचलुचपत प्रतिबंधक कलम सातअन्वये, अशी तीन कलमे वाढविण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलिस उपअधीक्षकांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाचा दबाव असण्याचा प्रश्‍नच येत नाही, असेही पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी स्पष्ट केले.

गुन्हे शाबीतचा दर अधिक

गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्हे शाबीत होण्याचा दर अधिक आहे. मालमत्तेविरुद्धचे गुन्हे, तसेच खून, हाणामारी, त्यात जखमा आदी गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. जुगार, दारूबंदी आदी गुन्ह्यांबाबत वेळोवेळी कारवाई झालेली असल्याचे अभिलेखात नोंदलेले आहे, असेही श्री. बारकुंड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Assembly Election 2024 Result: मालेगाव मध्यने थंडीत फोडला घाम; जिल्ह्यातील 14 मतदारसंघांचे निकाल निर्धारित वेळेत

IND vs AUS 1st Test : OUCH! विराट कोहलीने खणखणीत Six मारला, चेंडू निवांत बसलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर आदळला, Video

Manoj Jarange News: आम्ही मैदानात उतरलो नाही, तरीही फेल झाले म्हणता... मनोज जरांगेंचा सवाल

दिग्दर्शक आदित्य धारबरोबर रणवीरने सुवर्णमंदिरात घेतलं दर्शन ; 'या' बिग बजेट प्रोजेक्टच्या शूटिंगला होणार सुरुवात

Sunil Shelke Won Maval: तो एक फोटो अन्... भाजप विरोधात तरी सुनील शेळके कसे निवडून आले? अजित पवारांनी सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT