Independent candidate Satyajit Tambe addressing a meeting at Nandurbar on the occasion of Nashik graduate constituency election. esakal
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe | ऋणानुबंध कायमच राहण्यासाठी गावभेटी : सत्यजित तांबे

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवारी करतेवेळी नामांकन दाखल करताना झालेले राजकारण आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठीचं झाले असून वेळ आल्यावर याबद्दल मी बोलेलच, असा इशाराही अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी देताना अक्कलकुव्याच्या मणिबेलीपासून ते नगरच्या चौंडीपर्यत अहिल्याबाई होळकरांचे जन्मस्थळ असलेल्या साडेपाचशे किलोमीटर परिसरात डॉ. सुधीर तांबेंनी मतदारांशी बनवलेला ऋणानुबंध कायमच चालु राहण्यासाठी आम्ही शेवटच्या घटकापर्यत पोहचतं असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. (Satyajeet Tambe statement Village visits to keep debt relationship alive nashik news)

नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या प्रचारार्थ नंदुरबारमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात सभा आयोजित केली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, मी कॉग्रेस पक्षाला सांगितले मला उमेदवारी द्या, परंतु काही कारणास्तव निर्णय झाला नाही.

मी कॉग्रेसकडुन नामांकन देखील दाखल केले. मात्र माझा एबी फार्म माझ्यापर्यंत पोहचलाचं नाही. त्यामुळे मला अपक्ष उमेदवारी करावी लागली. मागील २० वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून काम करतं आहे. आता मोठ्या व्यासपीठावर प्रश्न मांडण्याची संधी मिळाली पाहिजे.

शिक्षकांची अपुरी संख्या, शिपाई, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या, भरती नसल्याने यंत्रणेवर निर्माण झालेला मोठा ताण, संस्थाचालकांचे असे अनेक गंभीर प्रश्न आहे. एप्रिल महिन्यात शिक्षक परिषद भरविण्याचा मानस आहे. ‘जुनी पेंशन, नो टेंशन’ म्हणत याबाबत डॉ. तांबेंनी जुनी पेंशन लागू करण्यासाठी परिषदेत प्रश्न मांडला.

अभ्यास मंडळाची स्थापना करण्यासाठी हिमाचल, राजस्थान राज्यात समिती पाठविण्याची मागणी केली. जुनी पेंशनमध्ये दाखवले जाणारी आकडेवारी चुकीची असल्याचे वास्तव निदर्शनास आणले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

जुनी पेंशन मुद्दा आगामी काळात देशाच्या निवडणुकीचा मुद्दा होईल, असा दावा त्यांनी केला. शिक्षण, आरोग्य या दोन बाबी नागरिकांना मोफत मिळायला हव्यात. सरकारचा अर्थसंकल्पात शिक्षणावरचा खर्च अवघे अडीच टक्के आहे. तो खर्च सात टक्क्यांच्या वर गेला पाहिजे. यावेळी हिरालाल पगडाल, बी.एस. पाटील, नागेश दादा पाडवी, यशवंत पाटील, मनोज रघुवंशी, एन. डी. नांद्रे, सुरेश झावरे, युवराज पाटील आदी उपस्थित होते.

अपक्ष उमेदवारी राजकारणासाठी नाही : रघुवंशी

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, सत्यजित तांबे यांची अपक्ष उमेदवारी राजकारणासाठी नाही. सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तांबेंना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT