School Management Committees of zp Schools No 1 and 2 oppose school merge dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule ZP School News : ‘त्या’ 52 शाळांचे एकत्रीकरण बारगळणार; शालेय व्यवस्थापन समित्यांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

Dhule ZP School News : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५२ शाळांचे एकत्रीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी गेल्या महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली होती. बैठकीत ५२ शाळांच्या मुख्याध्यापकांचे समुपदेशन करण्यात आले.

गुरुजींनी त्यांच्या आणि इतर समस्या मांडल्या, पण शाळांचे एकत्रीकरण अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले. यामुळे एकत्रीकरणाबाबत गुरुजींचीही मानसिकता तयार झाली होती.

तेव्हा कोणताही विरोध विचारात घेतला जाणार नाही हे स्पष्ट झाले होते. (School Management Committees of zp Schools No 1 and 2 oppose school merge dhule news)

आता मात्र शालेय व्यवस्थापन समित्यांचा ठराव आणण्याचे सूचित करण्यात आले आहे. एकत्रीकरणाला व्यवस्थापन समित्यांनी पूर्णतः विरोध दर्शविल्याने हे एकत्रीकरण बारगळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात समग्र शिक्षा अभियानातून विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. गुणवत्तावाढीसाठी विविधांगी प्रयत्न होत आहेत. आता राज्यातील हजारावर शाळांचे एकत्रीकरण होणार आहे. एकाच आवारातील दोन शाळांची एकच शाळा होणार आहे. धुळे जिल्ह्यातील ५२ शाळा एकत्रीकरणाचे प्रस्ताव सादर झाले आहेत.

म्हणजे २६ शाळा कमी होऊन २६ शाळा अस्तित्वात येतील. या आशयाची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. यादीच प्रसिद्ध झाल्याने गुरुजींमध्ये खळबळ उडाली होती. आता या एकत्रीकरणास जोरदार विरोध होत आहे. शालेय व्यवस्थापन समित्यांनी एकत्रीकरणाच्या विरोधात ठराव दिले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांची बदली झाल्यानंतर एकत्रीकरणास खीळ बसली आहे. त्यांनी याबाबतीत गतिमान हालचाली केल्या होत्या. सध्या एकत्रीकरण बारगळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कारभार स्वतंत्र अन् मुले-मुली एकत्र बसवा

शाळा एकत्रीकरणाचा सध्या वेगळाच अर्थ लावला जात आहे. दोन्ही शाळांचा कारभार स्वतंत्र ठेवा. हजेरी वेगळी भरा. पण अध्यापन एकत्र करा. मुले-मुली एकत्रित बसवा, असा तोंडी फतवा निघाला आहे. यामुळे एकत्रीकरणाचा खेळखंडोबा सुरू झाल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही शाळांनी स्वतंत्र कारभार ठेवला आहे. परिपाठ आणि संमिश्र वर्ग अध्यापन सुरू ठेवले आहे.

-पूर्ण पट असलेल्या शाळा स्वतंत्रच असाव्यात.

-अपात्र शाळांचे व्हावे एकत्रीकरण.

-शाळा एकत्रीकरणाऐवजी मुले-मुली. एकत्रीकरणाचा प्रयोग होत आहे.

-आधी शालेय व्यवस्थापन समित्यांचा ठराव असंमत केला.

-आता ठराव आवश्यक.

-कापडणे, सोनगीर, लामकानी या गावांमध्ये एकत्रीकरणाला तीव्र विरोध.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT