Loksabha Election  sakal
उत्तर महाराष्ट्र

Loksabha Election : सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये ज्येष्ठ दिव्यांग मतदारांनी बजावला हक्क ; निवडणूक व अधिकारी कर्मचारी घरोघरी

सिंदखेड राजा मतदारसंघातील वृद्धापकाळ आजारपण व दिव्यांगत्वा मुळे मतदानास जाऊ न शकणाऱ्या ८५ वर्षावरील मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने घरून मतदानाचे सुविधा उपलब्ध करून दिली आहे

गजानन काळुसे

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा मतदारसंघातील वृद्धापकाळ आजारपण व दिव्यांगत्वा मुळे मतदानास जाऊ न शकणाऱ्या ८५ वर्षावरील मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने घरून मतदानाचे सुविधा उपलब्ध करून दिली आहे,या गृहमतदानाला सिंदखेड राजा मतदार संघामध्ये ता.२१ एप्रिल पासून सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली 'वोट फ्रॉम होम' सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी दिव्यांग व ज्येष्ठानी उत्स्फूर्तपणे बलेट पेपर द्वारे गोपनीयता बाळगत मतदानाचा हक्क बजावला आहे.

सिंदखेड राजा मतदारसंघात १२ डी अर्ज भरून दिलेल्या ५३९ जेष्ठ तर ८९ दिव्यांग आहेत.यामध्ये वृध्द पुरुष मतदारांची संख्या २०१ असून वृद्ध महिला मतदारांची संख्या ३३८आहे. तसेच दिव्यांग मतदारांची संख्या ८९ असुन,यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६२ असून महिला मतदारांची संख्या २७ आहे.दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये बुलढाणा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे यावर्षी निवडणूक आयोगाने ८५ वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार व दिव्यांग मतदार ज्यांनी १२ डी नमुना भरून दिला आहे त्यांच्या घरी जाऊन आयोगाच्या निर्देशानुसार मतदार प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.

वयोवृद्ध व दिव्यांगांच्या मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून या पथकामध्ये मतदान अधिकारी सहाय्यक मतदान अधिकारी तसेच सूक्ष्म निरीक्षक पोलीस व व्हिडिओग्राफर यांचा समावेश आहे.मतदारसंघामध्ये १९ टीम तयार करण्यात आल्या असुन ३६ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले आहे.नायब तहसीलदार निवडणूक मनोज सातव, नायब तहसीलदार डॉ.आस्मा मुजावर,गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, अंकुश म्हस्के, प्रकाश शिंदे,संजय सोनुने, प्रशांत वाघ,भगवान मुसळे,गणेश देशमुख यांच्यासह निवडणूक विभागाचे कर्मचारी काम करत आहे.

ज्येष्ठ दिव्यांगांचे असे होत आहे मतदान

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना घरातून मतदान करण्यासाठी ता. २१,२२,व २३ एप्रिल रोजी मतदान करून घेतले जाणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांची एक टीम संबंधित मतदारांच्या घरी जाणार आहे,यामध्ये अधिकारी,कर्मचारी, पोलीस, व्हिडिओग्राफर यांचा समावेश आहे.संबंधित व्यक्तीच्या घरात स्वातंत्र्य टेबलावर मतदान करण्यासाठी कक्ष तयार केला जातो.त्या व्यक्तीला कसे मतदान करायचे हे सांगण्यात येते, घरातून होणाऱ्या मतदानासाठी पोस्टल मत पत्रिका देण्यात येणार येत आहे.या संपूर्ण प्रक्रियेच्या चित्रीकरण करण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मतदारसंघ निहाय आकडेवारी :

बुलढाणा मतदारसंघ ज्येष्ठ नागरीक ११२,दिव्यांग ८४ एकूण १९६ चिखली मतदारसंघ ज्येष्ठ नागरीक ३१८ दिव्यांग ९६ एकूण ४१४,सिंदखेड राजा मतदारसंघ ज्येष्ठ नागरीक ५३९ ,दिव्यांग ८९ एकूण६२८ ,मेहकर मतदारसंघ ज्येष्ठ नागरीक ८२० ,दिव्यांग २६३ एकूण ११०३, खामगांव ज्येष्ठ नागरीक १२०, दिव्यांग ८३ एकूण २०३ ,जळगांव जामोद ज्येष्ठ नागरीक २६२ ,दिव्यांग ५७ एकूण ३१९ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT