Bacteria on crop esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : जिवाणूंचा शिरकाव शोधून काढणार सेन्सर; देशभरातील 13 प्राध्यापकांना पेटंट

सकाळ वृत्तसेवा

तळोदा (जि. नंदुरबार) : फळे व भाजीपाल्यावर बॅक्टेरिया अर्थात जिवाणूंचा शिरकाव झाला आहे अथवा नाही तसेच त्यावर किती प्रमाणात बॅक्टेरिया आहेत हे सेन्सरद्वारे शोधून काढण्याचा तंत्रज्ञानाला व त्यांच्या कल्पनेला तळोद्यातील डॉ. महेंद्र माळी यांच्यासह देशभरातील बारा प्राध्यापकांना पेटंट मिळाले आहे. पेटंट मिळाल्याने त्यासंबंधी डिव्हाइस बनविताना या सर्व प्राध्यापकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, या संशोधनात तळोद्यातील प्राध्यापकाचा समावेश असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (sensor detect entry of bacteria Patented to 13 professors across country Nandurbar News)

मानवी जीवनात फळे व भाजीपाल्याचा दररोजच्या आहारात उपयोग होतो. त्यामुळे फळ व भाजीपाला बाजारात नेहमी गर्दी असते. तज्ज्ञदेखील फळांचा व भाजीपाल्याचा समावेश दररोजच्या आहारात असावा, असा सल्ला देत असतात. मात्र फळे व भाजीपाला नाशवंत असल्याने अत्यंत सांभाळून फळे व भाजीपाला शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना ठेवावी लागतात.

व्यवस्थित न ठेवल्याने फळे व भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढते. बॅक्टेरियांच्या शिरकाव झाल्यास ते लवकर खराब होतात. त्यात फळे व भाजीपाल्याचे दैनंदिन जीवनात महत्त्व लक्षात घेऊन डॉ. महेंद्र माळी व त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी फळे व भाजीपाला यात बॅक्टेरिया शोधून काढण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे ठरविले व तसा अभ्यास केला. त्यातून त्यांच्या कल्पनेचा विस्तार होत गेला. या कल्पनेतून फळे व भाजीपाल्यावरील बॅक्टेरिया शोधण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

त्यातून डिझायनिंग अ स्मार्ट सिस्टिम एम्बेडेड विथ बायो सेन्सर फोर आयसोलेशन ॲन्ड आयडेंटिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया फ्रॉम फ्रूट्स ॲन्ड व्हेजिटेबल या नावाने त्यांना पेटंट मिळाले आहे. त्यामुळे यातून भविष्यात फळे व भाजीपाल्यावरील बॅक्टेरिया शोधून काढण्यास मदत मिळणार आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून भविष्यात फळे व भाजीपाला यातील बॅक्टेरियाचे प्रमाण शोधून काढता येणार आहे. त्यामुळे डॉ. प्रा. महेंद्र माळी व सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

या सेन्सरच्या संशोधनात डॉ. महेंद्र माळी यांच्यासह नवी दिल्ली येथील डॉ. सुरेंद्रकुमार यादव, मुरूड जंजिरा येथील अमानउल्ला खान पठाण, विशाखापटणम येथील डॉ. एस. सुभा, कटकचे डॉ. संदीप राऊत, गुंटूरचे के. व्ही. दयासागर, जालंदर (पंजाब)चे डॉ. अशोककुमार कोशरिया, एसआयटी लोणावळा येथील अभिजित विश्वनाथ शिंदे, डॉ. जे. पी. जोशमर्लीन, डेहराडूनचे डॉ. कुमुदपंत, जयपूरचे डॉ. आर. संजीव व कुमारपलायम येथील डॉ. शिजा एस. राजन या प्राध्यापकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT