Dhule News : साक्री तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गोटू ऊर्फ रवींद्र चौधरी (कोकणी) याला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती वाय. जी. देशमुख यांनी हा निकाल दिला.
साक्री तालुक्यातून गोटू ऊर्फ रवींद्र बाबूराव चौधरी याने आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवून नेले. ही घटना २४ ऑगस्ट २०१७ ला घडली होती. नंतर पीडितेला नाशिक येथे नेत रवींद्रने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.(Sexual assault on a girl Forced labor for one and seven years Result of Deshmukh Incident of Sakri Taluka Dhule Crime News)
घटनेबद्दल साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पीडितेचे वडील व नातलगांनी अल्पवयीन मुलीसह रवींद्र याला २८ ऑगस्ट २०१७ ला गावी आणले. पीडितेला विश्वासात घेत विचारपूस केल्यावर तिने अत्याचार झाल्याचे सांगितले.
याप्रकरणी धुळे न्यायालयात न्या. श्रीमती देशमुख यांच्या समक्ष कामकाज सुरू होते. सरकार पक्षातर्फे अॅड. शुभांगी जाधव यांनी बाजू मांडली. उपलब्ध पुरावे, संदर्भ व युक्तिवाद ग्राह्य धरून रवींद्र चौधरी याला दोषी ठरविण्यात आले.
तसेच त्याला सात वर्षे सक्तमजुरी व २७ हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी वकील शुभांगी जाधव यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर, प्रभारी सहायक संचालक तथा सरकारी अभियोक्ता अॅड. संजय मुरक्या यांनी सहकार्य केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.