Sharad Choudhary Principal of zp School No 2 planted flowers dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : उन्हाळी सुटीतही गुरुजी रमले शाळेत; झाडे जगविण्यासाठी शरद चौधरींची धडपड

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राज्यातील सर्वच शाळांना उन्हाळी सुटी सुरू आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकही सुटीचा आनंद मनमुराद लुटत आहेत. बरेचसे शिक्षक पर्यटन अनुभवत आहेत. पण मी आणि माझी शाळा म्हणत, काही शिक्षक सुटीतही शाळेत रमले आहेत. (Sharad Choudhary Principal of zp School No 2 planted flowers dhule news)

येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनचे मुख्याध्यापक शरद चौधरी यांनी फुलवलेली फुलझाडे. अन त्यांना ऐन उन्हाळ्यात जगविण्यासाठी ते धडपडत आहेत. ते सुटीतही पाणी घालण्यासाठी वेळ देत आहेत.

येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक एकशे साठ आणि शाळा क्रमांक दोनची पन्नाशीकडे वाटचाल सुरु आहे. आजही या शाळांची गुणवत्ता वाखाणण्यासारखी आहे. पूर्वीपेक्षा अधिक गुणवत्ता कशी वाढेल, याकडे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे प्रयत्न सुरु असतात.

दोन्ही शाळांमध्ये गुणवत्तेची निकोप स्पर्धा पाहायला मिळते. शाळेतील शिक्षकांनी वर्गाच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. शाळा डिजिटल आहे. या शाळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बुवनेश्वरी यांनी कौतुक केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

येथील मुख्याध्यापक आणि शिक्षक सुट्या असूनही शाळा आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. मोबाईलच्या माध्यमातून सुटीतील अभ्यास करून घेत आहेत.

तर मुख्याध्यापक शाळेचा परिसर सुंदर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. फुलविलेले फुलझाडे आणि रोपट्यांना पाणी घालण्यासाठी नियमित येत आहेत. सुटीतही राबणाऱ्या शिक्षकांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

"शाळेचा परिसर बोलका आणि फुलझाडांनी नटलेला हवा. मुले आणि फुले प्रफुल्लित असली म्हणजे शिक्षकांचेही मन रमते. ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेत बाग फुलवायची आहे." -शरद चौधरी, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची सपाट सुरुवात; मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी, अदानी समूहाचे शेअर्स कोसळले

Karad Accident : मलकापुरात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार; कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरच अपघात

Bike Accident : भरधाव टेम्पोच्या धडकेत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जागीच ठार; डोक्याला गंभीर मार लागला अन्..

SCROLL FOR NEXT