NCP Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसशी गद्दारी करीत अजित पवार हे भाजप सोबत सत्तेत सहभागी झाल्याचा आरोप करीत नरडाणा (ता. शिंदखेडा) येथे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. (sharad pawar supporters protest against ajit pawar dhule news)
शिंदे- फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेल्या पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा रॅलीतील एका दुचाकीला बांधून मिरविण्यात आला. अजित पवार आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असे पक्षाचे येथील जिल्हा परिषद सदस्य ललित वारूडे यांनी सांगितले.
आंदोलक श्री. वारूडे म्हणाले, की राज्याच्या राजकारण चार दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भूकंप घडविला. आपल्या सोबत राष्ट्रवादीचे काही आमदार नेत श्री. पवार थेट उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत अन्य आठ जण मंत्री झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नरडाणा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दोर बांधून सामान्य कार्यकर्त्यांनी तो फरफटत नेला. त्यावेळी पक्षाध्यक्ष राष्ट्रीय नेते शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा जयजयकार आंदोलकांनी केला. शिवाय अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
येणाऱ्या काळात अजित पवार आणि त्यांच्या साथीदारांना जनता जागा दाखवेल, असा विश्वास श्री. वारुळे यांनी व्यक्त केला. रॅलीत अजय भामरे, पंकज पाटील, सागर निळे, राहुल पवार, कपिल पाटील,पंकज सोनवणे, गटलू सिसोदे, मुन्ना सिसोदे, सुनील पवार, मनोज मोरे, विजय पवार, केतन पवार, योगेश चौधरी, आकाश बोरसे, प्रशांत पाटील, अनिल पाटील, गोलू सोनार, रोहित पाटील, सुरज सैंदाणे यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.