Former Union Agriculture Minister Sharad Pawar during a friendly inquiry regarding Turkish millet corn. and Kunal Shinde showing Turkish millet corn  
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : अबब... 3 ते 4 फुटांचे कणीस! तुर्की बाजरीची शरद पवारांनी घेतली दखल

विनोद शिंदे

Dhule News : येथील प्रगतिशील शेतकरी तथा राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या शेतात त्यांचे पुत्र कुणाल शिंदे यांनी तुर्की देशी वाण या उन्हाळी बाजरीचा पंधरा एकरांवर पेरा केला आहे. (Sharad Pawar took notice of Turkish millet dhule news)

विशेष म्हणजे या बाजरीचे कणीस तब्बल तीन फुटांपर्यंत आहे. या आगळ्यावेगळ्या वाणाची पेरणी केलेल्या बाजरीचे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये कुतूहल व आश्चर्य असल्याने श्री. शिंदे यांच्या शेतात शेतकरी पाहणी करण्यासाठी येत आहेत.

शेतकऱ्यांसाठी नेहमी आत्मीयता असणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनीही दखल घेतली असून, त्यांनी कुणाल शिंदे यांना भेटीसाठी बोलविले आहे.

कुसुंबा परिसरात शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्याप्रमाणे तुर्की देशी वाण पेरण्याचा वेगळा प्रयोग युवा शेतकरी कुणाल यांनी केला असून, त्यांना एक एकरात ४० क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तीन फुटांचे कणीस धरून बाजरीची उंची बारा फुटांची आहे. पंचक्रोशीतील शेतकरी बाजरी पाहून गेल्याने शेतकऱ्यांनी येत्या खरिपात हीच बाजरी पेरण्याचा मानस व्यक्त केला आहे. बाजरीचा पेरा जानेवारीत करण्यात आला असून, आता काढण्यावर आली आहे. यातून चाराही मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.

"येत्या खरिपात शेतकऱ्यांनी तुर्की देशी वाणाची पेरणी करावी, कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळेल. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही. शेतकऱ्यांना योग्य दरात बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल. बाजरीला एकरी दहा हजार खर्च येतो. या बाजरीमध्ये कार्बोहायर्डेट व इतर घटक असल्याने याची गावठी बाजरीत गणना होते. अजून अॅव्हरेज कसा वाढेल याकडे लक्ष दिले जाणार आहे." -कुणाल शिंदे, कुसुंबा, ता. धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT