Shasan Aplya Dari : सरकारच्या विविध योजनांतून अनेकांना जगण्यास बळ मिळते. त्याची प्रचीती येथील एसआरफीएफच्या मैदानावर शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय उपक्रमांतर्गत सोमवारी (ता. १०) आली. (shasan aplya dari Plans empower many people to live dhule news)
पाडळदे (ता. धुळे) येथील यशवंती पापड समूहाने २० हजारांच्या निधीतून सुरू केलेला हा उद्योग वार्षिक १६ लाखांच्या उलाढालीपर्यंत पोचला आहे, तर आर्वी (ता. धुळे) येथील विद्यार्थिनी सायकल मिळाल्याने, तसेच कामगार विभागातर्फे काही कामगारांना सुरक्षा साहित्य मिळाल्याने तेही खूश दिसून आले.
शासकीय योजनांचा लाभ तत्पर आणि जलद मिळेल असे वाटले नव्हते. ‘योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी’ या टॅगलाइनला साजेसा राज्य शासनाचा कारभार जीवन जगण्यास बळ देत असल्याची भावना शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थिनी, कष्टकरी, बांधकाम कामगारांनी व्यक्त केली.
शिक्षण घेणे सुकर
गावापासून पाच किलोमीटरवरील आर्वीतील (ता. धुळे) विद्यालयात जाण्यासाठी एसटीची खूप वेळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत होता. कधी-कधी एसटी न आल्याने शाळेला अनुपस्थिती होत होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आता मात्र मला शासनाने सायकल दिल्यामुळे आम्हा शिक्षण घेणे सुकर झाले. वेळेचा सदुपयोगही करता आला. अभ्यासाला अधिक वेळ देता आला, अशी भावना नववीतील दिव्या मांडगे, विद्या अहिरे व मोनाली सोनवणे हिने व्यक्त केली. त्यांना शासनाच्या मानव विकास मिशनच्या माध्यमातून सायकल दिली गेली.
कामगारांना सुरक्षेची हमी
कामगार विभागातर्फे अत्यावश्यक व सुरक्षा संच मिळाल्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी काम करताना सुरक्षेची हमी मिळाल्याची भावना नानाभाऊ पाटील (सैताळे, ता. धुळे), आशा पाटील, मंगलाबाई निंबा पाटील (माळीच, ता. शिंदखेडा) यांनी व्यक्त केली. संचामध्ये चटई, जेवणाचा डबा, पाणी बॉटल, बॅटरी, मच्छरदाणी व बॅग दिली जाते.
सुरक्षा संचात हेल्मेट, जॅकेट, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट, एअर प्लॅग, मास्क व हॅन्डग्लोव्हज असे साहित्य दिले जाते. बांधकाम मजुराला १० हजार २४० किमतीचे असे साहित्य घेणे परवडणारे नसते. त्यामुळे सुरक्षा साहित्याविना कामगार काम करतात. मात्र कामगार विभागाने हे साहित्य दिल्याने कामगार समाधानी आहेत. त्यांनी शासनाचे आभार मानले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
व्यवसायासाठी मिळाली उमेद
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती (उमेद) अभियानात पाडळदे (ता. धुळे) येथील रेणुका चव्हाण यांनी ओम साई राम बचतगटाच्या माध्यमातून यशवंती पापड उद्योग सुरू केला आहे. त्यासाठी त्यांना शासनाने आर्थिक पाठबळ दिले आहे.
यात २० हजार रुपयांपासून सुरू झालेला त्यांचा पापड उद्योग वार्षिक १६ लाखांच्या उलाढालीचा झाला आहे. जीवनात कोणतीही नवी आशा, उमेद नसताना शासनाचे उमेद अभियान मदतीसाठी धावून आले आणि उद्योग-व्यवसायासाठी आर्थिक उमेद मिळाल्याची भावना श्रीमती चव्हाण यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.