Kapdane: A herd of shepherds from Waghapur in Shivarat Sakri Taluka. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कापडणे शिवारात चाऱ्याच्या शोधात मेंढपाळ दाखल

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामाच्या उत्तरार्धात अधिक पाऊस झाला. अति पावसाने पाण्याच्या स्त्रोतांची पातळी वाढली. बऱ्यापैकी पातळी आहे.

बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जनावरांसाठी उन्हाळ्यात चाऱ्यासाठी भटकंती सुरु व्हायची. यावर्षी चाऱ्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे.

जिल्ह्यातील मेंढपाळ जिल्ह्यातच भटकंती करीत आहेत. साक्री तालुक्यातील मेंढपाळांची अधिक संख्या आहे. ते कापडणे, धनूर, धमाणे, कौठळ व न्याहळोद शिवारात दाखल झाले आहेत. (Shepherds entered in search of fodder in Kapadane Shivar Dhule News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

विहिरी, कूपनलिका आणि धरणांतील पाण्याच्या आवर्तनामुळे बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. रब्बीसह मेथी आणि कोथिंबिरीचे क्षेत्र वाढले आहे. चाऱ्याची मोठी उपलब्धता आहे. साक्री तालुक्यातील मेंढपाळांसाठी चाऱ्याची मोठी उपलब्धता पर्वणी ठरली आहे.

ते तालुक्यात तळ ठोकून आहेत. त्यांचाही शेती कामासाठीही अधिक उपयोग होत आहे. चराईच्या बदल्यात लहानमोठी शेतीकामे त्यांच्याकडून उरकली जात आहे. मेंढपाळांना जिल्ह्यातच चाऱ्याची उपलब्धता झाल्याने शेजारील जिल्ह्यात होणारे स्थलांतर लांबले आहे. दरम्यान मेंढपाळांचे जीवन कष्टाचे आहे. चाऱ्यासाठी आठही महिने भटकंती करावी लागते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आजही प्रलंबीत असल्याची अशी खंत मेंढपाळ किशोर ठेलारीने व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT