Farmers uprooting cotton crop from horticultural farmers in Malpur Shiwar area. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिंदखेडा तालुक्यात कापूस पीक खाली करण्यास सुरवात; तीव्र स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांना यंदा दुष्काळाची चांगलीच झळ सोसावी लागणार आहे. सहाशे ते सातशे मिलिमीटर सरासरी पाऊस या भागात होतो. यंदा दोंडाईचा परिसरात तीनशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला नाही. त्यामुळे बागायतदार, कोरडवाहू शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे.

बागायतदारांनी कापूस काढणीस सुरवात केली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे.(Shindkheda taluka cotton crop has started to be harvested dhule news)

रब्बी हंगामातील पिकांना पाणी पुरणार नसल्याने दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. शासनाने मध्यम स्वरूपाच्या दुष्काळाऐवजी तीव्र स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला पाहिजे होता, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

चार महिने झालेल्या पावसाळ्यात एकदाही जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर गेला नाही. परिणामी जलयुक्त शिवाराचे बंधारे, मध्यम प्रकल्पां (धरण)मध्ये ठणठणाट आहे. बागायतदार शेतकऱ्यांच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढलीच नाही. पावसाळी कांदालागवडही करता आली नाही.

मेच्या अखेरीस लागवड केलेल्या कापसाला पुरेशा प्रमाणात पाणी देता आले नाही. त्यामुळे एकरी आठ ते दहा क्विंटल कापूस उत्पादनाला शेतकरी मुकला आहे. दोन-तीन वेचण्यांतच कापूस पीक खाली झाले. रोगराईच्या प्रादुर्भावामुळे कापसाचा फर्दा घेता येत नाही. अखेर कापूस उपटून काढावा लागत आहे.कापूस उत्पादन घटले तरीही भाव वाढून मिळत नाही.

ही खंत व्यक्त केली जात आहे. पंधरा हजार रुपये भाव मिळण्याची आशा होती. सात हजारांपेक्षा जास्त भाव कापूस पिकाला मिळत नाही. त्यामुळे कापूस खरेदी शासनाने करावी, अशी मागणी शेतकरी करू लागला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांचे भांडवलही निघणार नसल्याचे चित्र आहे. एक ते दीड महिना पावसाने दडी मारली. मध्यंतरी तुरळक स्वरूपाच्या पावसात कोरडवाहू शेतकऱ्यांचा कापूस उभा होता.

आंतरमशागतीची कामे झाली. परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. लागवड केलेल्या कापूस मजुरीलाही परवडणार नाही. भांडवलही निघणार नसल्याचे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शेवटी कापूस पिकात शेळ्या-मेंढ्या फिरविल्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी भावना शेतकरी व्यक्त करू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT