धुळे : महापालिकेसह सत्ताधारी भाजपकडून १५४ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा गाजावाजा करण्यात आला. प्रत्यक्षात या योजनेचे काम अद्याप अपूर्ण असून शेकडो किलोमीटर अंथरलेली पाइपलाइन, तसेच नव्याने उभारलेले जलकुंभ जलसाठ्या वाचून तहानलेलेच आहेत.(shivsena thakare group allegations on municipal corporation on water scarcity issue dhule news)
परिणामी, जलकुंभाला तडे जात आहेत. ही स्थिती का, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिकेसह भाजपवर आरोपांचा वार करत जलकुंभावर शनिवारी (ता. २१) आंदोलन केले.
शहराला तापी पाणीपुरवठा, डेडरगाव तलाव, नकाणे तलाव, हरण्यामाळ तलाव, पांझरा नदीतून थेट पाणी उचलून पुरवठा केला जातो. तरीही आठवड्यानंतर पाणीपुरवठा होत असल्याने शहर तहानलेलेच असते. शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात अडचणी येतात.
सध्या चार ते पाच, तर काही ठिकाणी आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होतो. तोही कमी दाबाने होतो. लोकप्रतिनिधींकडून रोज पाणीपुरवठ्याबाबत वल्गना केल्या जातात. केवळ नियोजनाअभावी मुबलक पाणी असूनही पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर ठरला आहे.
हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
शहरात १५४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना गैरकारभाराच्या गाळात रुतली असून यात ओव्हरसियर, अधिकारी, लोकप्रतिनिधींनी आपले उखळ पांढरे करून घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे सलग अकराव्यादिवशी या योजनेतील गैरकारभाराविरोधात घोषणाबाजी करत फॉरेस्ट कॉलनीतील पं. हरिवंशराय बच्चन जलकुंभावर आंदोलन केले.
तीन वर्षांपासून नवे जलकुंभ भरलेच गेले नाहीत. त्यामुळे कोट्यवधींचा निधी पाण्यात जात आहे, असा आरोप करत या योजनेची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाईची मागणी आंदोलक जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, धीरज पाटील, संघटक देवीदास लोणारी, राजेश पटवारी, ललित माळी, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, मच्छिंद्र निकम, विनोद जगताप, महादू गवळी, संजय जवराज, प्रवीण साळवे, छोटू माळी, कैलास मराठे, हिमांशू परदेशी, पंकज भारस्कर आदींनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.