An attractive replica of Sri Rama's temple and chariot made of chocolate by Mayura Parakh. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मयुरा पारख यांनी साकारले चॉकलेटचे श्रीराम मंदिर

श्रीरामाप्रति असलेली निस्सीम भक्ती चॉकलेटच्या श्रीरामाचे मंदिर साकारून व्यक्त केली आहे येथील एक रामभक्ताने.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथे श्रीरामाप्रति असलेली निस्सीम भक्ती चॉकलेटच्या श्रीरामाचे मंदिर साकारून व्यक्त केली आहे येथील एक रामभक्ताने.

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील मयुरा अॅन्ड पटेल केक शॉपीच्या संस्थापिका मयुरा सुमीत पारख यांनी पंधरा किलो वजनाचे चॉकलेटचे आकर्षक श्रीराम मंदिर तयार केले आहे. (Shri Ram Mandir of chocolate made by Mayura Parkh dhule news)

दरम्यान, चार किलो चॉकलेटचा रथही बनविला. मंदिर पाहण्यासाठी शहर व परिसरातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. दर्शनासाठी आलेल्या रामभक्तांना प्रसादाचे वाटपही केले.

श्रीराम मंदिरात राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. मंदिरातील रंगसंगतीमुळे हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. मंदिर बनविण्याच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंदिरासाठी ४५ तासांचा, तर रथाकरिता ३० तासांचा अवधी लागला. जे. के. सुपर मार्केटमध्ये ठेवलेले मंदिर पाहण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी, शिक्षक, डॉक्टर, सोशल क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.

यात आमदार जयकुमार रावल, माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख आदींनी मंदिर पाहून समाधान व्यक्त केले. श्रीमती पारख यांनी यापूर्वी चॉकलेटचा गणपती साकारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT