Sarpanch-Upasarpanch etc. while handing over the copy of Gram Panchayat resolution to Gram Sevak.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : कन्यारत्नप्राप्त माता, पालकांचा करणार सन्मान; सोनबुद्रुक ग्रामपंचायतीचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : गटग्रामपंचायत सोनबुद्रुकमार्फत आदिवासी गौरव दिनानिमित्त ग्रामसभेत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीने कन्यारत्न झालेल्या आई-वडिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला.

गावातील विविध शासकीय पदावरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला.

त्यात शिवलाल पावरा, ओजाऱ्या पावरा, निवृत्त शिक्षक पावरा, तलाठी भालचंद्र पावरा तसेच भारतभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा बजावलेले माजी सैनिक डेका दादा पावरा यांनाही सन्मानित करण्यात आले. (Son Budruk Gram Panchayat decision to honor mothers and parents of daughters nandurbar news)

त्यानंतर गावपातळीवर विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने ज्यांनी २० वर्षांपासून ग्रामविकास विभागाचे उत्तम आणि आदर्श काम करणारे ग्रामसेवक गिरीश गोकुळ पाटील यांना आदर्श कर्मचारी आणि निरोप म्हणून आदिवासींचे प्रतीक म्हणून धनुष्यबाण, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

वैद्यकीय अधिकारी डॉ. रतिलाल पावरा, पशुधन अधिकारी डॉ. राजपाल पावरा, आंगणवाडीसेविका वंदना पावरा, एन. एम. खर्डे यांना आदर्श कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनादेखील आदर्श शेतकरी म्हणून सन्मान करण्यात आला. त्यात रमेश पावरा, रेल्या पावरा यांचा समावेश आहे. गावातील विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी बजावणारे विद्यार्थी यांचादेखील ग्रामपंचायतीमार्फत मेडल्स, ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्यात दिव्या पावरा, पिंटी पावरा, संदीप पावरा, योगेश पावरा, सुनील पटले यांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी केली, तसेच एमबीबीएससाठी निवड झालेले हिंमत पावरा, पिंकीना पावरा यांचादेखील सन्मान करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर गावातील दहावीवी ते बारावी प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांनादेखील गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शाळेत येण्यासाठी आवड निर्माण व्हावी म्हणून ग्रामपंचायतीमार्फत दप्तरवाटप करण्यात आले. त्यानंतर गावात माझी वसुंधरा अभियान राबविण्याकरिता ग्रामसेवक अशोक पावरा यांनी मार्गदर्शन करून त्याची शपथ उपस्थित ग्रामस्थांना दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामसेवक अशोक पावरा, सरपंच जयश्री मगन पावरा, उपसरपंच बजरंग पावरा, नारसिंग पावरा, पोलिसपाटील मगन पावरा, मेरसिंग पावरा, ग्रामपंचायत कर्मचारी वीरसिंग पावरा, रोजगार सेवक व इतर सदस्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच कृषी सहाय्यक राकेश पावरा, वनपाल पावरा, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेवक, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच आदिवासी जनजागृती टीमचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT