Dhule News : कापूस खरेदीचा कुठलाही परवाना न घेता व्यवसाय करणाऱ्या एका कापूस व्यापाऱ्यावर कारवाई करत त्याच्याकडील तब्बल ५९ क्विंटल कापूस जप्त करण्यात आला.
ही कारवाई साक्री बाजार समितीच्या पथकाने केली असून, कारवाईमुळे परवाना न घेता व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना जरब बसणार आहे.(Squad action against traders buying cotton without licence dhule news)
औरंगाबाद खंडपीठ व जिल्हा उपनिबंधक कार्यालय, धुळे यांच्या आदेशान्वये २०२३-२४ या वर्षात व्यापार करण्यासाठी माथाडी बोर्डाकडे मालक नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र काही व्यापारी ही नोंदणी न करता परस्पर शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत असल्याचे निदर्शनास येते आहे.
यानुसार नोंदणी न करता परस्पर खरेदी करणाऱ्या व्यापारांवर कारवाई करण्यासाठी साक्री बाजार समितीतर्फे पथक तयार करण्यात आले असून, यात बाजार समिती सचिव भूषण बच्छाव, माथाडी बोर्डाचे निरीक्षक दयानंद बोडरे, संदीप अहिरराव, नितीन तोरवणे यांचा समावेश आहे.
पथकाने या अनुषंगाने तपास केला असता बुधवारी नवापूर रोडलगत भाडणे शिवारात पुरुषोत्तम बापू चौधरी (रा. सुरपार) यांच्या अभिषेक ट्रेडिंग कंपनीच्या गुदामावर कारवाई करत त्यांच्याकडील ५९ क्विंटल ५५ किलो कापूस जप्त केला.
बेकायदेशीरपणे व्यापार करून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करणाऱ्यांवर यापुढेदेखील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले आहे. कारवाईसाठी या पथकास पोलिस निरीक्षक मोतीराम निकम, इरफान शेख, कलीम पटेल यांचे सहकार्य मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.