Nandurbar News : गावाकडील शेती विकून पैसे घेऊन सुरत येथे जाणाऱ्या व्यावसायिकाच्या बॅगेतून ट्रॅव्हलमधून चार लाखांची रोकड लांबविणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातून सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चार लाखांची रोकड हस्तगत केली.
कावसडी (ता. जिंतूर, जि. परभणी, ह.मु. शक्तीनगर, उधना, सुरत) येथील राजेश बालमुकुंद शर्मा (वय ४२) १२ वर्षांपासून सुरत येथे अगरबत्ती व देवपूजा भंडार विक्रीचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते; परंतु कर्जामुळे त्यांच्यावर गावाकडील शेत विकण्याची वेळ आली. (Stealing farmers money from travel Interstate criminal arrested with cash Nandurbar News)
कर्जातून बाहेर निघण्यासाठी त्यांनी गावाकडील एक एकर शेती विक्री केली व एक लाख ५० हजार रुपये पॅन्टच्या खिशात व चार लाख रुपये बॅगेत असे एकूण पाच लाख ५० हजार रुपये घेऊन २७ एप्रिल २०२३ ला सायंकाळी सातच्या सुमारास परभणी येथून सुरत येथे जाण्यासाठी निघाले.
२८ एप्रिलला पहाटे ६.४५ ला नवापूर पोलिस ठाणे हद्दीतील हॉटेल श्री साई सीताराम येथे राजेश शर्मा चहा पिण्यासाठी उतरले व परत जाऊन आपल्या जागेवर बसले. बसल्यानंतर त्यांनी त्यांची बॅग उघडून पाहिली असता बॅगेत ठेवलेले चार लाख रुपये दिसून आले नाहीत म्हणून त्यांनी
ट्रॅव्हल्समधील इतर प्रवाशांना व आजूबाजूला शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. श्री. शर्मा यांचे पैसे चोरी झाल्याची त्यांना खात्री झाली. त्यांनी तत्काळ नवापूर पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करून कारवाईबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर व नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना निर्देश दिले. पथके परभणी, गुजरात, मध्य प्रदेशात गेली.
परभणी ते नवापूरदरम्यान ट्रॅव्हल्स ज्या ज्या ठिकाणी थांबली त्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. माहिती हाती लागत नव्हती. १६ मेस नंदुरबार पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना माहिती मिळाली, की ट्रॅव्हल्समधून चोरी करणारा मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्याचा
आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळविले. त्यांनी एक पथक तयार करून धार जिल्ह्यात सतत तीन दिवस थांबून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचे नाव निष्पन्न केले.
तो घरी येत नव्हता. संशयित आरोपी १८ मेस रात्री त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली. त्याच्या घराच्या आजूबाजूला सापळा रचला. त्यास १९ मेस ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता आरिफ कालू खान असे सांगितले. त्याने चोरीची कबुली दिली. घरात ठेवलेले चार लाख रुपये हस्तगत केले. मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासकामी नवापूर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पोलिस पथकाला बक्षीस
मध्य प्रदेशात राज्यात जाऊन आरोपीस ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेले चार लाख रुपये हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलिस ठाण्याच्या पथकास नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी रोख बक्षीस जाहीर केले.
ही कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार मुकेश तावडे, महेंद्र नगराळे, पोलिस नाईक जितेंद्र ठाकूर, पोलिस अंमलदार अभय राजपूत, नवापूर पोलिस ठाण्याचे हवालदार दादाभाऊ वाघ, पोलिस नाईक विनोद पराडके यांच्या पथकाने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.