subodh gangurde esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : ध्येयवेडा ‘तो’ निघाला एव्हरेस्ट सर करायला!

धनंजय सोनवणे

साक्री (जि. धुळे) : आयुष्यात अनेक ध्येये/स्वप्ने घेऊन आपण जगत असतो. मात्र ती पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारे खूप कमी असतात. यातीलच एक ध्येयवेडा तरुण राज्यातील ३७० किल्ले सर करून पुढे स्वराज्याची भगवी पताका जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) शिखरावर फडकवण्यासाठी निघालाय... ते ही सायकल प्रवासाने. या ध्येयवेढ्या तरुणाचे नाव सुबोध विजय गांगुर्डे. (Subodh Gangurde going to climb Mount Everest on bicycle journey dhule news)

आतापर्यंत तीन हजार किलोमीटर सायकलने प्रवास करून ९७ किल्ले सर केले असून, नाशिक जिल्ह्यातील किल्ले सर झाल्यानंतर साक्री तालुक्यातील भामेर किल्ल्याच्या मोहिमेसाठी तो गुरुवारी (ता. २) साक्रीत पोचला.

त्यानंतर धुळे जिल्ह्यातील लळिंग व सोनगीर येथील किल्ला सर केल्यानंतर तो मालेगावनजीकचा गाळणा किल्ला सर करून पुढे मार्गस्थ होणार आहे. शुक्रवारी (ता. ३) साक्री येथील शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे स्वागत करत संवाद साधला.

या वेळी ‘सकाळ’शी बोलताना सुबोधला म्हणाला, की हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन नोकरी करत असताना छंददेखील जोपासावेत या अनुषंगाने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेऊन हिमालयातील विविध ठिकाणी गिर्यारोहण करत होतो.

हे करत असतानाच आपल्या मातीची महती जगभरात पोचावी, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जगभरात पोचावा या अनुषंगाने महाराष्ट्रातील अधिकाधिक गडकिल्ल्यांवर भ्रमंती करून यानंतर जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या माउंट एव्हरेस्टवर छत्रपती शिवरायांचा भगवा फडकवावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम सुरू केली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

यात रायगड जिल्ह्यातील अवचित गडापासून याची सुरवात करून ३६५ दिवसांत राज्यातील ३७० किल्ले सर करून स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्यावर या दुर्ग भेट मोहिमेचा समारोप होणार आहे. यानंतर माउंट एव्हरेस्ट येथे जाऊन हा भगवा ध्वज फडकविण्याचा संकल्प सोडला आहे.

हे करत असताना हा संपूर्ण प्रवास सायकलीने करण्याचादेखील निश्चय केला असून, यातून पर्यावरण संवर्धनाचादेखील संदेश देत आहे. प्रवास करत असताना दिवसभरात शक्य तितके किल्ले सर करून, किमान ७० ते ८० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर विश्रांती घेतो.

तसेच प्रवासात अनेक ठिकाणी शाळा-महाविद्यालयांमध्येदेखील भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना या गड-किल्ल्यांचे महत्त्व सांगत असतानाच पर्यावरण संवर्धन करण्यासंदर्भातदेखील आवाहन करत असल्याचे त्याने या वेळी सांगितले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अवघ्या २४ वर्षांचा सुबोध मूळ रोहा (जि. रायगड) येथील असून, ७१ दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील अवचित गडापासून त्याची ही दुर्ग भेटीची मोहीम सुरू झाली. ३६५ दिवसांत राज्यातील ३७० किल्ले सर करण्याचे उद्दिष्ट त्याने निश्चित केले असून, या अनुषंगाने तो दररोज राज्यातील किल्ल्यांची भ्रमंती करत आहे. हे करत असताना हा संपूर्ण प्रवास मात्र तो पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतो. सायकलने प्रवास करत आहे हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT