Success Story : भामेर (ता. साक्री) येथील नम्रता विठ्ठल सोनवणे व जयश्री विठ्ठल सोनवणे या भगिनी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांतून अधिकारी होत सेवेत दाखल झाल्या आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना एकाच वेळी दोघी बहिणी अधिकारी झाल्याने गावासोबतच तालुक्यात त्यांचे विशेष कौतुक होत आहे. (success story 2 sisters become officer at same time dhule news)
भामेर येथील रहिवासी तथा व्यवसायानिमित्त नाशिक येथे स्थायिक झालेले विठ्ठल सोनवणे व वंदना सोनवणे यांच्या दोन्ही मुली एकाच वेळी अधिकारी झाल्या. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने विठ्ठल सोनवणे काही वर्षांपासून छोट्या-मोठे काम करून आपले घर, संसार चालवत आहेत.
यासाठी ते नाशिक येथे स्थायिक झाले असून, त्याच ठिकाणी लहान-मोठ्या कामातून ते आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. अशातच दोन्ही मुली हुशार असल्याने त्यांच्या शिक्षणासाठीदेखील त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दोन्ही मुलींनीदेखील आई-वडिलांच्या या कष्टाची जाणीव ठेवून चिकाटीने अभ्यास केला व यात मोठी मुलगी नम्रता सोनवणे हिने नुकत्याच झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली, तर लहान मुलगी जयश्री सोनवणे हिने एलआयसीच्या विकास अधिकारी या वर्ग दोनच्या पदांची परीक्षा उत्तीर्ण होत अधिकारीपद मिळविले.
त्यांच्या जिद्द व चिकाटीमुळे प्रतिकूल परिस्थितीतदेखील दोघी बहिणींनी हे विशेष यश संपादन केले याचे गावासह तालुक्यात सर्वांनाच विशेष अप्रूप वाटत आहे. सोनवणे भगिनींच्या यशाच्या निमित्ताने भामेर गावाचेदेखील नाव उंचावल्याने ग्रामस्थांनीतर्फेदेखील या दोघी बहिणीं सोबतच त्यांच्या पालकांचा सन्मान करत कौतुक करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.