Bazar esakal
उत्तर महाराष्ट्र

Success Story : धुळेच्या तरुण अभियंत्याने पुण्यात फुलवला आठवडे बाजार

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : पुणे व पिंपरी चिंचवडमधील खुल्या बाजारपेठेत ‘शेतकरी आठवडेबाजारा’च्या संकल्पनेतून बाजारासाठी १५ गावांतील शेतकऱ्यांना हक्काच्या बाजारपेठसाठी जागा मिळवून दिली. ४८३ शेतकऱ्यांना रास्त दर मिळाला. एक लाख पन्नास हजार ग्राहकांना वाजवी भावात ताजा शेतमाल उपलब्ध झाला. वार्षिक उलाढाल नऊ कोटींपर्यंत पोचली आहे. हे सर्व धुळ्यातील तरुण संगणक अभियंता प्रीतेश देव यांनी नावीन्यपूर्ण काम केले. त्यासाठी त्यांनी श्री साई अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून मोठी भरारी घेतली आहे.

धुळे शहरातील प्रीतेश देवने संगणक अभियंत्याची पदवी घेतली. नोकरीसोबत मिळालेल्या वेळेतून शेतमालाचे मार्केटिंग करायचे ठरविले होते. वडील धुळे फ्रूट मार्केटला फ्रूट मर्चंट होते. बालपणापासूनच कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालाचा खरेदी-विक्रीचा अभ्यास होता. शेतकरी उत्पादन बाजार समितीत बऱ्याचदा कवडीमोलाने विकतात. शेतमाल वगळता इतर सर्व वस्तूंचा उत्पादक हा त्याच्या मालाचा विक्री दर ठरवीत असतो. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यालाही का मिळू नये, असा प्रश्न त्याला पडला. शेतकरी उत्पादक समूहांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याचा तेथून सुरू झाला अन् श्री साई शेतकरी आठवडेबाजाराचा प्रवास सुरू झाला आणि यशही मिळाले.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

फळे, पालेभाज्या व फळभाज्या या प्रकारातून १२ विविध गावांतून २६ शेतकरी उत्पादक गट स्थापन केले. मोठमोठ्या गटांचे गावातच ‘संकलन केंद्र’ उभारण्यात आले. भाड्याने व नंतर टप्प्याटप्प्याने या गटांनी २५ पिक-अप टेम्पो हप्त्याने विकत घेतले. देव यांनी नोकरीकरिता मुलाखतीची पूर्वतयारी करीत असतानाच पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेतील अनेक नगरसेवकांना भेटून ‘शेतकरी ते ग्राहक’ या संकल्पनेतून शेतकरी आठवडेबाजाराकरिता आठवड्याचा ठरलेला एक दिवस प्रभागातील मनपाचे मोकळे मैदान उपलब्ध करून देण्याच्या विनंतीस यश मिळाले.

''साई अॅग्रो शेतकरी बाजारामुळे प्रभागातील लोकांना ताजा शेतमाल व बचतगटांचे मसाला, कडधान्य, पापड व दुधजन्य पदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्यामुळे तसेच १२० ग्रामीण तरुणांना रोजगार मिळाल्यामुळे, केलेल्या प्रयत्नांचे व धडपडीचे समाधान वाटते.'' -प्रीतेश देव, श्री साई ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT